व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

देवाच्या राज्याबद्दल सांगण्यासाठी सप्टेंबर महिन्यात एक खास मोहीम!

देवाच्या राज्याबद्दल सांगण्यासाठी सप्टेंबर महिन्यात एक खास मोहीम!

देवाचं राज्यच मानवांच्या सगळ्या समस्या सोडवू शकतं हे लोकांना सांगण्यासाठी सप्टेंबर महिन्यात आपण खास प्रयत्न करणार आहोत. (मत्त २४:१४) त्यासाठी तुम्ही काय करू शकता? त्या महिन्यात, जास्तीत जास्त लोकांना देवाच्या राज्याबद्दल एखादं वचन दाखवायचा तुम्ही प्रयत्न करू शकता. कोणी आवड दाखवली तर त्यांना टेहळणी बुरूज क्र. २ २०२० या सार्वजनिक आवृत्तीची एक प्रत द्या. मग लवकरात लवकर त्या व्यक्‍तीची पुन्हा भेट घेऊन कायम जीवनाचा आनंद घ्या!  या माहितीपत्रकातून बायबल अभ्यास सुरू करायचा प्रयत्न करा. सप्टेंबर महिन्यात तुम्ही साहाय्यक पायनियरींग करणार असाल, तर तुम्ही १५ किंवा ३० तास करू शकता.

लवकरच देवाचं राज्य त्याचा विरोध करणाऱ्‍या सगळ्या सरकारांना चिरडून टाकेल. (दान २:४४; १कर १५:२४, २५) म्हणून खास मोहिमेच्या या खास संधीचा फायदा घेऊन आपण यहोवाच्या आणि त्याच्या राज्याच्या बाजूने आहोत हे दाखवू या!