ख्रिस्ती जीवन
यहोवासारखं एकनिष्ठ प्रेम दाखवा
एकनिष्ठ प्रेम दाखवण्याच्या बाबतीत यहोवापेक्षा चांगलं उदाहरण कोणाचंच नाही. (स्तो १०३:११) हे प्रेम काही क्षणांचं किंवा आज आहे उद्या नाही असं नाही; तर ते शेवटपर्यंत साथ देणारं गाढ प्रेम आहे. असं प्रेम यहोवाने बऱ्याच मार्गांनी इस्राएली लोकांना दाखवलं. त्याने त्यांना इजिप्तच्या गुलामीतून सोडवलं आणि वचन दिलेल्या देशात आणलं. (स्तो १०५:४२-४४) तो त्यांच्या बाजूने लढला आणि ते बऱ्याचदा चुकले तरी तो त्यांना माफ करत राहिला. (स्तो १०७:१९, २०) ‘यहोवाने एकनिष्ठ प्रेमाने केलेल्या कार्यांवर’ आपण मनन केलं तर त्याच्यासारखं एकनिष्ठ प्रेम दाखवायची प्रेरणा आपल्याला मिळेल.—स्तो १०७:४३.
“यहोवाचं एकनिष्ठ प्रेम दाखवणाऱ्या कार्यांवर मनन करा” हा व्हिडिओ पाहा आणि पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
-
आपण कोणकोणत्या मार्गांनी एकनिष्ठ प्रेम दाखवू शकतो?
-
एकनिष्ठ प्रेम दाखवण्यासाठी त्याग करणं का गरजेचं आहे?