देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
योग्य मित्र निवडा आणि यहोवाला एकनिष्ठ राहा
अम्मोनी आणि मवाबी लोकांनी “देवाच्या मंडळीत कधीही येऊ नये,” असं सांगण्यात आलं होतं. कारण त्यांनी नेहमीच देवाच्या लोकांचा विरोध केला होता (नहे १३:१, २; इन्साइट-१ ९५ ¶५)
महायाजक एल्याशीबने एका अम्मोनी व्यक्तीला मंदिरातली “जेवणाची खोली” वापरायला दिली होती (नहे १३:४, ५; टेहळणी बुरूज१३ ८/१५ ४ ¶५-६)
एल्याशीबने देवाच्या शत्रूसाठी केलेली ही व्यवस्था नहेम्याने उधळून लावली आणि असं करून यहोवासोबत असलेली आपली निष्ठा दाखवून दिली. (नहे १३:७-९)
यहोवावर प्रेम न करणाऱ्या लोकांशी जर आपण मैत्री केली तर आपण यहोवाला एकनिष्ठ आहोत, असं खरंच म्हणता येईल का?—टेहळणी बुरूज९६ ३/१५ १६ ¶६.
स्वतःला विचारा, ‘मी ज्या प्रकारच्या लोकांसोबत मैत्री करतो त्याबद्दल यहोवाला कसं वाटतं?’