देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
अंगमेहनतीचं काम करायला तुम्हाला कमीपणा वाटतो का?
महायाजकाने आणि त्याच्या भावांनी असा विचार केला नाही, की यरुशलेमच्या भिंती बांधणं हे आपलं काम नाही (नहे ३:१)
काही प्रतिष्ठित लोकांनी “देखरेख करणाऱ्यांच्या हाताखाली” दुरुस्तीचं काम करायला नकार दिला (नहे ३:५; टेहळणी बुरूज०६ २/१ १० ¶१)
देवाची भीती बाळगणाऱ्या स्त्रियांनी अंगमेहनतीच्या कामात आनंदाने सहभाग घेतला (नहे ३:१२; टेहळणी बुरूज१९.१० २३ ¶११)
मंडळीत अशी बरीच कामं असतात जी लोकांना हलक्या दर्जाची वाटतात, ज्यांसाठी खूप मेहनतीची गरज असते आणि जी सहसा लोकांना दिसत नाहीत.—टेहळणी बुरूज०४ ८/१ १८ ¶१६.
स्वतःला विचारा, ‘आनंदाच्या संदेशासाठी मला अशी कामं करावी लागली तर मला कसं वाटेल?’—१कर ९:२३.