व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

Kokkinakis v. Greece: Droit réservé

वरच्या बाजूने डावीकडून: वेस्ट व्हर्जिनिया स्टेट बोर्ड ऑफ एजुकेशन विरुद्ध बारनेट; कोकीनाकीस विरुद्ध ग्रीस; टॅगनरॉग एल. आर. ओ. आणि इतर विरुद्ध रशिया; चॅ आणि इतर विरुद्ध दक्षिण कोरिया

ख्रिस्ती जीवन

‘आनंदाच्या संदेशाचं समर्थन करणं आणि त्याला कायदेशीर मान्यता मिळवून देणं’

‘आनंदाच्या संदेशाचं समर्थन करणं आणि त्याला कायदेशीर मान्यता मिळवून देणं’

विरोधकांनी मंदिराचं बांधकाम बंद पाडायचा प्रयत्न केला, तेव्हा इस्राएली लोकांनी कायद्याची मदत घेऊन आपलं बांधकाम चालू ठेवलं. (एज ५:११-१६) आनंदाच्या संदेशाचं समर्थन करण्यासाठी आणि त्याला कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी ख्रिश्‍चनांनीसुद्धा अशाच प्रकारे प्रयत्न केले. (फिलि १:७) त्यासाठी १९३६ साली जागतिक मुख्यालयात कायदे विभागाची स्थापना करण्यात आली. आज, जागतिक मुख्यालयातला हा कायदे विभाग जगभरात राज्याच्या कामाचं समर्थन करण्यासाठी काम करत आहे. तो हे कसं करतो आणि त्यामुळे देवाच्या लोकांना कसा फायदा झालाय?

जागतिक मुख्यालयातल्या कायदे विभागाची ओळख,  हा व्हिडिओ पाहा आणि पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • यहोवाच्या साक्षीदारांना कोणत्या कायदेशीर समस्यांचा सामना करावा लागलाय?

  • कोणत्या न्यायालयीन खटल्यांमध्ये आपल्या बाजूने निकाल लागला आहे? एक उदाहरण द्या.

  • आनंदाच्या संदेशाचं ‘समर्थन करण्यासाठी आणि त्याला कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी’ आपल्यापैकी प्रत्येक जण काय करू शकतो?