ख्रिस्ती जीवन
आपल्यासाठी ते खूप मेहनत घेतात
विभागीय पर्यवेक्षक आणि त्यांच्या पत्नी आपल्यावर असलेल्या प्रेमापोटी खूप त्याग करतात. त्यांच्याही आपल्यासारख्याच गरजा असतात आणि आपल्यासारखंच त्यांनाही थकवा, निराशा आणि चिंता यांचा सामना करावा लागतो. (याक ५:१७) असं असलं, तरी दर आठवडी वेगवेगळ्या मंडळ्यांना भेट देताना तिथल्या भाऊबहिणींना कसं प्रोत्साहन देता येईल याचा ते विचार करतात. खरंच, आपले विभागीय पर्यवेक्षक “दुप्पट मान” द्यायच्या योग्यतेचे आहेत!—१ती ५:१७.
प्रेषित पौल रोममधल्या भाऊबहिणींना “देवाकडून असलेली एखादी देणगी” देण्यासाठी भेटायची योजना करत होता. तसंच या भेटीमुळे “एकमेकांना प्रोत्साहन” मिळेल असंही त्याला वाटत होतं. (रोम १:११, १२) तुमच्या विभागीय पर्यवेक्षकांना, आणि जर त्यांचं लग्न झालं असेल, तर त्यांच्या पत्नीला प्रोत्साहन कसं देता येईल याचा तुम्ही विचार केलाय का?
करू या सफर एका विभागीय पर्यवेक्षकासोबत हा व्हिडिओ पाहा आणि पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
-
आपल्यावर असलेल्या प्रेमापोटी विभागीय पर्यवेक्षक आणि त्यांच्या पत्नी कोणकोणत्या मार्गांनी त्याग करतात?
-
त्यांच्या मेहनतीमुळे तुम्हाला स्वतःला कसा फायदा झालाय?
-
आपण त्यांना प्रोत्साहन कसं देऊ शकतो?