व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

नहेम्याने सेवा करवून घेतली नाही, त्याने स्वतः सेवा केली

नहेम्याने सेवा करवून घेतली नाही, त्याने स्वतः सेवा केली

नहेम्याने आपल्या अधिकाराचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग केला नाही (नहे ५:१४, १५, १७, १८; टेहळणी बुरूज०२ ११/१ २७ ¶३)

नहेम्याने फक्‍त कामाची देखरेख केली नाही, तर त्याने स्वतःसुद्धा कामात हातभार लावला (नहे ५:१६; टेहळणी बुरूज१६.०९ ६ ¶१६)

आपण दाखवलेल्या निःस्वार्थ प्रेमाची यहोवाने आठवण ठेवावी अशी विनंती नहेम्याने केली (नहे ५:१९; टेहळणी बुरूज०० २/१ ३२ ¶३)

नहेम्या एक राज्यपाल होता, तरी त्याने लोकांकडून विशेष वागणुकीची अपेक्षा केली नाही. मंडळीत ज्यांना सेवेच्या खास जबाबदाऱ्‍या आहेत त्यांच्यासाठी तो एक चांगलं उदाहरण आहे.

स्वतःला विचारा, ‘मी इतरांसाठी काय करू शकतो हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं, की इतर जण माझ्यासाठी काय करू शकतात हे जास्त महत्त्वाचं वाटतं?’