व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१५-२१ जुलै

स्तोत्रं ६३-६५

१५-२१ जुलै

गीत १०८ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. “तुझं एकनिष्ठ प्रेम जीवनापेक्षाही मौल्यवान आहे”

(१० मि.)

देवासोबतचं नातं आपल्या जीवनापेक्षा जास्त मौल्यवान आहे (स्तो ६३:३; टेहळणी बुरूज०१ १०/१५ १५-१६ ¶१७-१८)

यहोवाने एकनिष्ठ प्रेम कसं दाखवून दिलंय, यावर आपण मनन करतो तेव्हा त्याच्याबद्दलची आपली कदर आणखी वाढते (स्तो ६३:६; टेहळणी बुरूज१९.१२ २८ ¶४; टे.बु.१५ १०/१५ २४ ¶७)

देवाच्या एकनिष्ठ प्रेमाबद्दल कदर असल्यामुळे आपण त्याची आनंदाने स्तुती करायला प्रवृत्त होतो (स्तो ६३:४, ५; टेहळणी बुरूज०९ ७/१५ १६ ¶६)

कौटुंबिक उपासनेसाठी एक कल्पना: यहोवाने तुम्हाला एकनिष्ठ प्रेम कोणकोणत्या मार्गांनी दाखवलंय यावर चर्चा करा.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ६४:३​—आपलं बोलणं नेहमी प्रोत्साहन देणारं असावं म्हणून या वचनातून आपल्याला कशी प्रेरणा मिळते? (टेहळणी बुरूज०७-E ११/१५ १५ ¶६)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(२ मि.) घरोघरचं साक्षकार्य. घरमालकाला तुमची भाषा येत नाही. (शिष्य बनवा  धडा ३ मुद्दा ४)

५. संभाषण सुरू करण्यासाठी

(२ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. साक्ष देण्याआधीच तुमचं संभाषण संपतं. (शिष्य बनवा  धडा २ मुद्दा ४)

६. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. समोरच्या व्यक्‍तीला कोणत्या विषयामध्ये आवड आहे ते शोधा आणि त्याला पुन्हा भेटायची व्यवस्था करा (शिष्य बनवा  धडा १ मुद्दा ५)

७. विश्‍वासाबद्दल समजावून सांगणं

(४ मि.) प्रात्यक्षिक. सहसा विचारले जाणारे प्रश्‍न  ५१​—विषय: “मला ऐकायचं नाही,” असं म्हणणाऱ्‍या लोकांच्या घरी यहोवाचे साक्षीदार पुन्हा का जातात? (शिष्य बनवा  धडा ४ मुद्दा ३)

ख्रिस्ती जीवन

गीत १५४

८. देवावर आपलं प्रेम आहे हे आपण कसं दाखवतो?

(१५ मि.) चर्चा.

यहोवा “एकनिष्ठ प्रेमाने भरलेला” देव आहे. (स्तो ८६:१५) “एकनिष्ठ प्रेम” म्हणजे जबाबदारीच्या भावनेने, प्रामाणिकपणे, एकनिष्ठेने आणि आपुलकीच्या भावनेने प्रवृत्त होणारं प्रेम. यहोवा सगळ्या मानवांवर प्रेम करत असला, तरीपण त्याच्या सेवकांवर म्हणजे ज्यांच्यासोबत त्याचं एक खास नातं आहे, त्यांच्यावर तो जे विशेष प्रेम करतो त्याला “एकनिष्ठ प्रेम” म्हटलंय. (स्तो ३३:१८; ६३:३; योह ३:१६; प्रेका १४:१७) आपणसुद्धा जेव्हा यहोवावर प्रेम करतो तेव्हा यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमाबद्दल आपल्याला कदर असल्याचं आपण दाखवत असतो. मग आपण हे कसं दाखवू शकतो? त्याची आज्ञा पाळण्याद्वारे आपण हे करू शकतो. यात “शिष्य करा” ही आज्ञा पाळणंसुद्धा येतं.​—मत्त २८:१९; १यो ५:३.

सेवाकार्यात कधीही नाहीसं न होणारं प्रेम दाखवत राहा  हा व्हिडिओ दाखवा. आणि विचारा:

खाली दिलेल्या परिस्थितींमध्ये आनंदाची बातमी सांगायला प्रेम आपल्याला कसं प्रवृत्त करतं?

  •   आपण थकलेलो असतो तेव्हा . . .

  •   विरोधाचा सामना करावा लागतो तेव्हा . . .

  •   दररोजची कामं करत असतो तेव्हा . . .

९. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ७९ आणि प्रार्थना