व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१९-२५ ऑगस्ट

स्तोत्रं ७५-७७

१९-२५ ऑगस्ट

गीत १०७ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. बढाई का मारू नये?

(१० मि.)

बढाई मारणारे आणि गर्विष्ठ लोक देवाला आवडत नाहीत (स्तो ७५:४; १ती ३:६; टेहळणी बुरूज१८.०१ २८ ¶४-५)

मंडळीत आपल्याला मिळणारी प्रत्येक जबाबदारी किंवा नेमणूक ही आपल्या क्षमतेमुळे मिळत नाही तर ती यहोवाकडून मिळालेली एक भेट आहे (स्तो ७५:५-७; टेहळणी बुरूज०६ ८/१ ४ ¶१)

पृथ्वीवरच्या अधिकाऱ्‍यांप्रमाणे जे गर्विष्ठ असतात त्यांना यहोवा नमवतो (स्तो ७६:१२)

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ७६:१०​—‘माणसाच्या रागामुळे’ यहोवाची स्तुती कशी होते (टेहळणी बुरूज०६ ८/१ ४ ¶२)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. समोरच्या व्यक्‍तीला त्याच्या भाषेतल्या jw.org वरच्या एखाद्या व्हिडिओबद्दल सांगा. (शिष्य बनवा  धडा १ मुद्दा ४)

५. संभाषण सुरू करण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. घरमालक देवाला मानत नसल्याचं सांगतो, तेव्हा परिस्थितीनुसार आपला विषय बदला. (शिष्य बनवा  धडा २ मुद्दा ५)

६. शिष्य बनवण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

गीत १२७

७. तुमची स्तुती होते तेव्हा एकनिष्ठ राहा

(७ मि.) चर्चा.

येशूप्रमाणे एकनिष्ठ रहा​—आपली स्तुती होत असताना  हा व्हिडिओ दाखवा. आणि विचारा:

  • इतरांनी भाऊ सरगेईची स्तुती केली तेव्हा त्यांनी ज्याप्रमाणे नम्रपणे उत्तर दिलं त्यावरून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

८. सप्टेंबर महिन्यात कायम जीवनाचा आनंद घ्या!  या पुस्तकातून बायबल अभ्यास सुरू करण्याची खास मोहीम

(८ मि.) हा भाग सेवा पर्यवेक्षक हाताळतील. या मोहिमेसाठी भाऊबहिणींच्या मनात उत्साह निर्माण करा आणि यासाठी ज्या स्थानिक योजना करण्यात आल्या आहेत त्यांबद्दल सांगा.

९. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ९५ आणि प्रार्थना