व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२२–२८ जुलै

स्तोत्रं ६६-६८

२२–२८ जुलै

गीत ७ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. यहोवा दररोज आपलं ओझं वाहतो

(१० मि.)

यहोवा आपल्या प्रार्थना ऐकतो आणि त्यांचं उत्तर देतो (स्तो ६६:१९; टेहळणी बुरूज२३.०५ १२ ¶१५)

यहोवा लाचार आणि अनाथ लोकांकडे खास लक्ष देतो (स्तो ६८:५; टेहळणी बुरूज११ ४/१ ३१ ¶५; टे.बु.०९ १०/१ २१ ¶१)

यहोवा दररोज आपल्याला मदत करतो (स्तो ६८:१९; टेहळणी बुरूज२३.०१ १९ ¶१७)

यावर मनन करा: यहोवाने आपलं ओझं वाहावं म्हणून आपण काय करू शकतो?

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ६८:१८​—प्राचीन इस्राएलच्या काळात “माणसांच्या रूपात भेटी” कोण होते? (टेहळणी बुरूज०६ ६/१ ८ ¶१)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. घरमालक तुमच्यापेक्षा वेगळ्या भाषेचा, संस्कृतीचा किंवा देशाचा आहे. (शिष्य बनवा  धडा ५ मुद्दा ३)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. मागच्या भेटीत तुम्ही दिलेल्या पत्रिकेवर पुढे चर्चा सुरू ठेवा. (शिष्य बनवा  धडा ९ मुद्दा ३)

६. शिष्य बनवण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

गीत १०२

७. तुम्ही एखाद्याचं ओझं हलकं करू शकता का?

(१५ मि.) चर्चा.

देवाच्या कोणत्याच सेवकाला जीवनातल्या समस्यांचा एकट्यानेच सामना करायची गरज नाही. (२इत २०:१५; स्तो १२७:१) कारण आपली मदत करण्यासाठी यहोवा आपल्यासोबत आहे. (यश ४१:१०) यहोवा कोणत्या मार्गांनी आपली मदत करतो? तो आपल्याला त्याच्या वचनातून आणि त्याच्या संघटनेकडून मार्गदर्शन देतो. (यश ४८:१७) तसंच तो आपल्याला त्याची पवित्र शक्‍ती देतो. (लूक ११:१३) यासोबतच तो आपल्याला प्रोत्साहन आणि व्यावहारिक मार्गांनी मदत पुरवण्यासाठी आपल्या भाऊबहिणींना प्रेरणा देतो. (२कर ७:६) याचा अर्थ यहोवा आपल्यापैकी कोणालाही आपल्या भाऊबहिणींचं ओझं हलकं करायला वापरू शकतो.

मंडळीत कधीही नाहीसं न होणारं प्रेम दाखवत राहा​—वृद्धांबद्दल  हा व्हिडिओ दाखवा आणि विचारा:

  •   मंडळीतल्या वयस्कर भाऊबहिणींचं ओझं हलकं करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

मंडळीत कधीही नाहीसं न होणारं प्रेम दाखवत राहा​—पूर्ण वेळेच्या सेवकांबद्दल  हा व्हिडिओ दाखवा आणि विचारा:

  •   पूर्ण वेळेच्या सेवेत असलेल्या भाऊबहिणींचं ओझं हलकं करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

मंडळीत कधीही नाहीसं न होणारं प्रेम दाखवत राहा ​बाहेरच्या देशातून आलेल्या बांधवांबद्दल हा व्हिडिओ दाखवा आणि विचारा:

  •   बाहेरच्या देशातून आलेल्या भाऊबहिणींचं ओझं हलकं करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

८. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ८८ आणि प्रार्थना