व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२६ ऑगस्ट–१ सप्टेंबर

स्तोत्र ७८

२६ ऑगस्ट–१ सप्टेंबर

गीत ९४ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. इस्राएली लोकांच्या अविश्‍वासूपणाचं अनुकरण करू नका

(१० मि.)

इस्राएली लोक यहोवाची अद्‌भुत कार्यं विसरून गेले (स्तो ७८:११, ४२; टेहळणी बुरूज९६ १२/१ २९-३०)

इस्राएली लोकांना यहोवाने दिलेल्या आशीर्वादांची कदर नव्हती (स्तो ७८:१९; टेहळणी बुरूज०६ ८/१ १० ¶१६)

इस्राएली लोक त्यांच्या चुकांमधून शिकले नाहीत. उलट पुन्हा-पुन्हा ते यहोवाशी अविश्‍वासूपणे वागले (स्तो ७८:४०, ४१, ५६, ५७; टेहळणी बुरूज११-E ७/१ १० ¶३-४)


यावर मनन करा: बंडखोर मनोवृत्ती आपल्यात येऊ नये म्हणून कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते?

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ७८:२४, २५—मान्‍नाला “स्वर्गातलं धान्य” आणि “स्वर्गदूतांचं अन्‍न” असं का म्हटलंय? (टेहळणी बुरूज०६ ८/१ ४ ¶३)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. बायबल अभ्यासासाठी विचारा. (शिष्य बनवा  धडा ५ मुद्दा ५)

५. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. पत्रिकेचा वापर करून संभाषण सुरू करा आणि बायबल अभ्यासासाठी विचारा. (शिष्य बनवा  धडा ५ मुद्दा ४)

६. संभाषण सुरू करण्यासाठी

(१ मि.) घरोघरचं साक्षकार्य. घरमालक थोडक्यात बोलायला सांगतो. बायबल अभ्यासासाठी विचारा. (शिष्य बनवा  धडा २ मुद्दा ५)

७. संभाषण सुरू करण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. बायबलचा उल्लेख न करता तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक आहात हे बोलता-बोलता सांगा आणि बायबल अभ्यासाबद्दल विचारा. (शिष्य बनवा  धडा २ मुद्दा ४)

ख्रिस्ती जीवन

गीत ९६

८. आवेशी प्रचारक फिलिप्पच्या उदाहरणातून शिका

(१५ मि.) चर्चा.

बायबलमध्ये बरीच चांगली आणि वाईट उदाहरणं आहेत. या उदाहरणांमधून शिकून घ्यायला आपण वेळ काढला पाहिजे आणि मेहनत घेतली पाहिजे. बायबल अहवाल वाचण्यासोबतच आपण त्यातल्या धड्यांवर मनन केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनात बदल केले पाहिजेत.

प्रचारक फिलिप्प हा “बुद्धीने आणि पवित्र शक्‍तीने भरलेला” ख्रिस्ती सेवक म्हणून ओळखला जात होता. (प्रेका ६:३, ५) त्याच्या उदाहणातून आपल्याला काय शिकायला मिळतं?

त्यांच्या उदाहरणातून शिका​—आवेशी प्रचारक फिलिप्प  हा व्हिडिओ दाखवा. आणि विचारा: खाली दिलेल्या गोष्टींमुळे तुम्हाला काय शिकायला मिळालं?

  •   परिस्थिती अचानक बदलली तेव्हा फिलिप्पने काही गोष्टी केल्या.​—प्रेका ८:१, ४, ५

  •   गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा केल्यामुळे त्याला आशीर्वाद मिळाले.​—प्रेका ८:६-८, २६-३१, ३४-४०

  •   पाहुणचार केल्यामुळे फिलिप्प आणि त्याच्या कुटुंबाला फायदा झाला.​—प्रेका २१:८-१०

  •   फिलिप्पच्या उदाहरणाचं अनुकरण केल्यामुळे व्हिडिओत दाखवलेल्या कुटुंबाला आनंद अनुभवायला मिळाला

९. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत १०१ आणि प्रार्थना