२९ जुलै–४ ऑगस्ट
स्तोत्र ६९
गीत १३ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. येशूच्या जीवनात घडणाऱ्या घटनांबद्दल स्तोत्र ६९ मध्ये आधीच सांगण्यात आलं होतं
(१० मि.)
काही कारण नसताना येशूचा द्वेष करण्यात आला (स्तो ६९:४; योह १५:२४, २५; टेहळणी बुरूज११ ८/१५ ११ ¶१७)
येशू खऱ्या उपासनेसाठी आवेशी होता (स्तो ६९:९; योह २:१३-१७; टेहळणी बुरूज१० १२/१५ ८ ¶७-८)
येशूच्या मनाला खूप यातना होत होत्या आणि त्याला कडू पदार्थ मिसळलेला द्राक्षारस देण्यात आला (स्तो ६९:२०, २१; मत्त २७:३४; लूक २२:४४; योह १९:३४; सावध राहा!९५-E १०/२२ ३१ ¶४; इन्साइट-२ ६५०)
यावर मनन करा: यहोवाने हिब्रू शास्त्रवचनांमध्ये मसीहाबद्दलच्या भविष्यवाण्यांचा समावेश का केला?
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
-
स्तो ६९:३०, ३१—या वचनांमुळे आपल्याला आपल्या प्रार्थनांचा दर्जा वाढवायला कशी मदत होऊ शकते? (टेहळणी बुरूज९९ १/१५ १८ ¶११)
-
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) स्तो ६९:१-२५ (शिकवणे अभ्यास २)
४. धीर धरा—येशूने काय केलं?
(७ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा आणि शिष्य बनवा धडा ८ मुद्दे १-२ वर चर्चा.
५. धीर धरा—येशूने केलं तसं करा
(८ मि.) शिष्य बनवा धडा ८ मुद्दे ३-५ आणि “ही वचनंही पाहा” यावर चर्चा.
गीत १३४
६. मंडळीच्या गरजा
(५ मि.)
७. कौटुंबिक उपासनेसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी
(१० मि.) चर्चा.
पूर्वी आठवड्यादरम्यान दोन सभा व्हायच्या. एक मंडळीचा पुस्तक अभ्यास आणि दुसरी ईश्वरशासित सेवा प्रशाला आणि सेवा सभा. पण जानेवारी २००९ मध्ये या दोन्ही सभा एकत्र करण्यात आल्या, ज्याला आपण आठवड्यादरम्यान होणारी सभा म्हणतो. त्यामुळे भाऊबहिणींना दर आठवडी कौटुंबिक उपासनेसाठी एक दिवस वापरता आला. बऱ्याच भाऊबहिणींनी याबद्दल आपली कदर व्यक्त केली आहे. कारण यहोवाच्या आणि एकमेकांच्या आणखी जवळ येण्यासाठी बनवण्यात आलेल्या या योजनेमुळे त्यांना मदत झाली आहे.—अनु ६:६, ७.
चांगल्या प्रकारे आणि नियमितपणे कौटुंबिक उपासना करता यावी म्हणून कुटुंबप्रमुखांना कोणत्या काही महत्त्वाच्या गोष्टींमुळे मदत होऊ शकते?
-
नियमितपणे करा. शक्य असेल, तर दर आठवडी कौटुंबिक उपासनेसाठी एक निश्चित वेळ ठरवा. तसंच काही कारणांमुळे जर त्या वेळी करणं शक्य नसेल तर त्यासाठी एक पर्यायी दिवस ठरवा
-
तयारी करा. कौटुंबिक उपासनेत काय करता येईल, याबद्दल पत्नीला आणि कधीकधी मुलांनासुद्धा विचारा. कौटुंबिक उपासनेसाठी खूप जास्त तयारी करायची गरज नाही; खासकरून कुटुंबाला जेव्हा कौटुंबिक उपासनेत एकाच प्रकारच्या गोष्टी करायला आवडतं
-
कुटुंबाच्या गरजा लक्षात घ्या. मुलं मोठी होत जातात तशा त्यांच्या गरजा आणि क्षमताही बदलत जातात. त्यामुळे कौटुंबिक उपासनेच्या कार्यक्रमामुळे कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला आध्यात्मिक प्रगती करायला मदत झाली पाहिजे
-
आनंदी आणि खेळीमेळीचं वातावरण ठेवा. बाहेर वातावरण चांगलं असेल तर तुम्ही कधीकधी कौटुंबिक उपासना बाहेरसुद्धा करू शकता. गरजेचं असेल तेव्हा मध्ये ब्रेकसुद्धा घेऊ शकता. कुटुंबाला तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्यांबद्दल जरी खासकरून कौटुंबिक उपासनेत चर्चा करणं गरजेचं असलं, तरी मुलांना फक्त रागवायला आणि त्यांना शिस्त लावायला कौटुंबिक उपासनेचा उपयोग करू नका
-
वेगवेगळ्या गोष्टी करा. उदाहरणार्थ, तुम्ही पुढच्या सभेच्या एखाद्या भागाची तयारी करू शकता, jw.org वरचा एखादा व्हिडिओ पाहून त्यावर चर्चा करू शकता किंवा प्रचारकार्याचा सराव करू शकता. हे खरंय की कौटुंबिक उपासनेत सगळ्यांनी मिळून चर्चा करणं महत्त्वाचं आहे. पण असं असलं तरी कौटुंबिक उपासनेसाठी जेव्हा तुम्ही एकत्र येता आणि कौटुंबिक उपासना करत असता, तेव्हा प्रत्येकाला वैयक्तिक अभ्यासासाठीसुद्धा थोडा वेळ देऊ शकता
या प्रश्नावर चर्चा करा:
-
वर दिलेल्या मुद्द्यांना तुम्ही तुमच्या कौटुंबिक उपासनेत लागू करायचा कसा प्रयत्न केला आहे?
८. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) साक्ष द्या अध्या. १३ ¶८-१६, पान १०५ वरची चौकट