व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

५-११ ऑगस्ट

स्तोत्रं ७०-७२

५-११ ऑगस्ट

गीत ५९ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. देवाच्या सामर्थ्याबद्दल “पुढच्या पिढीला” सांगा

(१० मि.)

दावीद तरुण होता तेव्हा त्याने यहोवाचं संरक्षण अनुभवलं (स्तो ७१:५; टेहळणी बुरूज९९ ९/१ १८ ¶१७)

दावीदने त्याच्या म्हातारपणातही यहोवाची मदत अनुभवली (स्तो ७१:९; सावध राहा!०४-E १०/८ २३ ¶३)

आपला अनुभव सांगून दावीदने तरुणांना प्रोत्साहन दिलं (स्तो ७१:१७, १८; टेहळणी बुरूज१४ १/१५ २३ ¶४-५)

स्वतःला विचारा, ‘आमच्या कौटुंबिक उपासनेत, बऱ्‍याच काळापासून यहोवाची सेवा करणाऱ्‍या कोणत्या भावाची किंवा बहिणीची मुलाखत घ्यायला मला आवडेल?’

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ७२:८​—यहोवाने अब्राहामला उत्पत्ती १५:१८ मध्ये दिलेलं अभिवचन शलमोन राज्याच्या काळात कसं खरं ठरलं? (इन्साइट-१ ७६८)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. घरमालक वाद घालायचा प्रयत्न करतो तेव्हा प्रेमाने आणि शांतीने संभाषण तिथेच थांबवा. (शिष्य बनवा  धडा ४ मुद्दा ५)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. बायबल अभ्यास करायला संकोच वाटत असलेल्या एखाद्या नातेवाईकासोबत आधी चर्चा केलेल्या विषयावरच पुढे चर्चा सुरू ठेवा. (शिष्य बनवा  धडा ८ मुद्दा ४)

६. विश्‍वासाबद्दल समजावून सांगणं

(५ मि.) भाषण. सहसा विचारले जाणारे प्रश्‍न  ३२​—विषय: यहोवाचे साक्षीदार जुना करार मानतात का? (शिकवणे  अभ्यास १७)

ख्रिस्ती जीवन

गीत ७६

७. कौटुंबिक उपासनेसाठी काही कल्पना

(१५ मि.) चर्चा.

“यहोवाच्या शिस्तीत आणि शिक्षणात” मुलांना वाढवण्यासाठी कौटुंबिक उपासनेची वेळ खूप महत्त्वाची आहे. (इफि ६:४) शिकण्यासाठी मेहनत घ्यावी लागते, पण त्याच वेळी त्यातून आनंदसुद्धा अनुभवता येऊ शकतो. खासकरून बायबलची सत्यं समजून घेण्यासाठी मुलांमध्ये आवड निर्माण होत असते तेव्हा. (योह ६:२७; १पेत्र २:२) कौटुंबिक उपासनेतून मुलांना शिकता यावं आणि त्याच वेळी त्याची मजाही घेता यावी अशा प्रकारे कौटुंबिक उपासना घेण्यासाठी पालकांना मदत व्हावी म्हणून “ कौटुंबिक उपासनेसाठी काही कल्पना” या चौकटीची थोडक्यात उजळणी करा. आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  •   यांपैकी कोणते काही पर्याय वापरायला तुम्हाला आवडतील?

  •   याशिवाय आणखी कोणत्या गोष्टी फायद्याच्या आहेत असं तुम्हाला वाटतं?

कौटुंबिक उपासना आणखी चांगली कशी करता येईल?  हा व्हिडिओ दाखवा. आणि विचारा:

  •   कुटुंबात मुलं नसली तरी पती आपल्या पत्नीसाठी कौटुंबिक उपासना कशी मनोरंजक बनवू शकतो?

८. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत १२४ आणि प्रार्थना

a कार्डच्या एका बाजूला वचन असेल (उदा. उत्पत्ती ३:१५) आणि दुसऱ्‍या बाजूला वचनात काय म्हटलंय ते असेल.