नमुना सादरीकरणं
कुटुंब आनंदी बनवण्यासाठी कशाची गरज आहे? (T-३२ पान १)
प्रश्न: आपलं कुटुंब सुखी असावं असं आपल्या सर्वांनाच वाटतं. हा प्रश्न पाहा, “कुटुंब आनंदी बनवण्यासाठी कशाची गरज आहे?” तुम्हाला काय वाटतं?
वचन: लूक ११:२८
सादरता: या पत्रिकेत शास्त्राधारित तत्त्वं दिली आहेत जी आपल्याला कुटुंब आनंदी बनवण्यास मदत करतील.
कुटुंब आनंदी बनवण्यासाठी कशाची गरज आहे? (T-३२ पान ४)
प्रश्न: आपल्या सर्वांनाच आनंदी कौटुंबिक जीवन हवं असतं. पण ते कसं मिळू शकेल? कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपली भूमिका कशी पार पाडू शकतो? कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काय भूमिका आहे ते मी तुम्हाला शास्त्रवचनातून दाखवलं तर चालेल का?
वचन: इफि ५:१, २; किंवा कल ३:१८-२१
सादरता: या पत्रिकेत शास्त्राधारित तत्त्वं दिली आहेत जी आपल्याला कुटुंब आनंदी बनवण्यास मदत करतील.
देवाकडून आनंदाची बातमी!
प्रश्न: आजच्या दिवसांत लोकांची मनोवृत्ती कशी असेल ते आधीच पवित्रशास्त्रात सांगितलं होतं. बऱ्याच लोकांना हे वर्णन वर्तमानपत्र वाचण्यासारखं वाटतं. यांपैकी कोणत्या प्रकारचे लोक तुम्ही पाहिले आहेत किंवा त्यांच्याबद्दल ऐकलं आहे?
वचन: २ तीम ३:१-५
सादरता: ही शेवटच्या काळातील परिस्थिती देवावर प्रेम करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी का आहे ते या माहितीपत्रकात समजावलं आहे. [धडा १, प्रश्न २ दाखवा.]
स्वतःचं सादरीकरण तयार करा
वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.