व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | स्तोत्रे ६९-७३

यहोवाचे लोक खऱ्या उपासनेसाठी आवेशी असतात

यहोवाचे लोक खऱ्या उपासनेसाठी आवेशी असतात

खऱ्या उपासनेसाठी आपला आवेश स्पष्टपणे दिसून आला पाहिजे

६९:९

  • दाविदाने आयुष्यभर यहोवासाठी आवेश दाखवला

  • यहोवाच्या नावाची निंदा दाविदाने खपवून घेतली नाही

वयोवृद्ध बंधुभगिनी तरुणांना आवेशी होण्यास मदत करू शकतात

७१:१७, १८

  • दाविदाने, जो कदाचित या स्तोत्राचा लेखक होता पुढच्या पिढीला प्रोत्साहन देण्याची इच्छा व्यक्त केली

  • पालक आणि अनुभवी ख्रिस्ती तरुणांना प्रशिक्षण देऊ शकतात

आपला आवेश आपल्याला, देवाचे राज्य संपूर्ण मानवजातीसाठी काय करेल हे इतरांना सांगण्यास प्रवृत्त करतो

७२:३, १२, १४, १६-१९

  • वचन ३—सगळीकडे शांतीपूर्ण वातावरण असेल

  • वचन १२—दरिद्री, दीन व अनाथांना सोडवलं जाईल

  • वचन १४—कुठंही हिंसा नसेल

  • वचन १६—सर्वांसाठी पोटभर अन्न असेल