ख्रिस्ती जीवन
तुम्ही हे एका वर्षासाठी करून बघू शकता का?
नेमकं काय? सामान्य पायनियरिंग! यामुळे तुम्हाला खरंच भरभरून आशीर्वाद मिळतील. —नीति १०:२२.
पायनियरिंग केल्यामुळे. . .
-
तुम्ही प्रचार करण्यात कुशल व्हाल आणि त्यामुळे सेवाकार्यात आणखी आनंद मिळेल
-
यहोवासोबतचं तुमचं नातं आणखी मजबूत करू शकाल. तुम्ही त्याच्याबद्दल इतरांशी जितकं जास्त बोलाल तितक्याच जास्त वेळा तुम्हाला त्याच्या अद्भुत गुणांची आठवण होईल
-
स्वतःपेक्षा देवाच्या राज्याला जीवनात प्रथम स्थानी ठेवून जे समाधान मिळतं आणि दुसऱ्यांसाठी स्वतःला दिल्यामुळे जो आनंद मिळतो तो अनुभवू शकाल.—मत्त ६:३३; प्रेकृ २०:३५.
-
विभागीय पर्यवेक्षकांच्या भेटीदरम्यान होणाऱ्या पायनियर सभेला, विभागीय संमेलनच्या वेळी पायनियरांसोबत होणाऱ्या खास सभेला आणि पायनियर सेवा प्रशालेसाठीदेखील तुम्ही उपस्थित राहू शकाल
-
तुम्हाला बायबल अभ्यास सुरू करण्याच्या, चालवण्याच्या अनेक संधी मिळतील
-
तुम्ही इतर प्रचारकांसोबत जास्त वेळ घालवू शकाल आणि एकमेकांना प्रोत्साहन देऊ शकाल. —रोम १:११, १२