व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | स्तोत्रे ७४-७८

यहोवाच्या महत्कृत्यांचे स्मरण करा

यहोवाच्या महत्कृत्यांचे स्मरण करा

यहोवाने केलेल्या चांगल्या कार्यांवर मनन करणं गरजेचं आहे

७४:१६; ७७:६, ११, १२

  • मनन केल्यानं, देवाच्या वचनातील गोष्टी समजण्यास आणि त्याच्याकडून मिळत असलेल्या आध्यात्मिक अन्नाबद्दल मनापासून कदर वाढवण्यास मदत मिळते

  • यहोवाबद्दल सखोल विचार केल्यानं, आपल्याला त्याच्या अद्‌भुत कृत्यांची तसंच त्याने दिलेल्या सुंदर आशेची आठवण ठेवायला मदत होते

यहोवाच्या महत्कृत्यांमध्ये पुढील गोष्टी आहेत:

७४:१६, १७; ७५:६, ७; ७८:११-१७

  • सृष्टी

    जेवढं जास्त आपण सृष्टीविषयी शिकू तेवढं जास्त आपलं यहोवाविषयी आदरयुक्त भय वाढेल

  • मंडळीतील नियुक्त बांधव

    यहोवाने ज्यांना पुढाकार घेण्यास नेमलं आहे, अशांच्या आपण अधीन राहिलं पाहिजे

  • तारण केल्याची उदाहरणं

    यहोवाच्या तारणांच्या उदाहरणांची आठवण ठेवल्यानं आपला विश्वास बळकट होतो की, त्याच्याकडे आपल्या सेवकांचा सांभाळ करण्याची इच्छा व क्षमता आहे