चांगल्या शोमरोन्याचा दाखला
‘माझा शेजारी नेमका कोण आहे?’ या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी येशूने चांगल्या शोमरोन्याचा दाखला दिला. (लूक १०:२५-२९) येशूला माहीत होतं की ख्रिस्ती मंडळी ही “सर्व प्रकारच्या” लोकांनी मिळून बनणार होती आणि यात शोमरोनी व विदेशीही असणार होते. (योह १२:३२) या दाखल्यातून शिष्य शिकले की त्यांनी इतरांवर, तसंच त्यांच्यापेक्षा खूप वेगळे असणाऱ्यांवरही प्रेम करण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत.
स्वतःला विचारा:
-
‘वेगवेगळ्या संस्कृतीच्या बंधुभगिनींबद्दल मला काय वाटतं?’
-
‘मी जास्तकरून अशाच लोकांबरोबर वेळ घालवतो का, ज्यांच्या आवडी-निवडी, सवयी व इतर गोष्टी माझ्यासारख्याच आहेत?’
-
‘वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या बंधुभगिनींना चांगल्या प्रकारे ओळखण्याद्वारे मी माझं मन मोठं करू शकतो का?’ (२कर ६:१३)
मी कोणाला . . .
-
माझ्यासोबत प्रचाराला बोलवू शकतो?
-
माझ्या घरी जेवायला बोलवू शकतो?
-
पुढच्या कौटुंबिक उपासनेसाठी बोलवू शकतो?