येशूच्या मागे जाण्यासाठी व शिष्य बनण्यासाठी काय करणं गरजेचं आहे?
एखादा शेतकरी सरळ नांगरणी तेव्हाच करू शकतो जेव्हा तो मागे पाहून विचलित होत नाही. याप्रमाणेच एका ख्रिस्ती व्यक्तीनेही जगात मागे सोडून दिलेल्या गोष्टींकडे लक्ष देऊन विचलित होऊ नये.—फिलि ३:१३.
समस्यांचा सामना करताना आपल्याला वाटू शकतं, की ‘आपले आधीचेच दिवस बरे’ होते. कदाचित सत्यात येण्याआधीच्या दिवसांबद्दल आपण असा विचार करू. पण सहसा आपण गतकाळात आलेल्या समस्यांकडे कमी आणि आनंददायी प्रसंगांकडे जास्त लक्ष देत असू. इस्राएली लोकांनी मिसर देश सोडलं तेव्हा त्यांनीही असाच विचार केला. (गण ११:५, ६) जर आपल्या मनात सतत असेच विचार येत राहिले तर आपल्याला पुन्हा तीच जुनी जीवनशैली स्वीकारण्याचा मोह होऊ शकतो. तेव्हा आज मिळत असलेल्या आशीर्वादांचा आपण विचार केला पाहिजे आणि देवाच्या राज्यात मिळणाऱ्या आनंदावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.—२कर ४:१६-१८.