जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका जून २०१६
नमुना सादरीकरणं
T-33 पत्रिकेसाठी आणि देवाकडून आनंदाची बातमी या माहितीपत्रिकेसाठी नमुना सादरीकरणं. दिलेली उदाहरणं वापरून स्वतःचं सादरीकरण तयार करा.
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
यहोवावर भरवसा ठेवा आणि चांगलं कार्य करत राहा
स्तोत्र ३७ मधील व्यावहारिक सल्ल्याचं पालन करा.
ख्रिस्ती जीवन
सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—शिकवण्यासाठी व्हिडिओंचा वापर करा
आपण आपल्या ख्रिस्ती सेवेत व्हिडिओंचा उपयोग का केला पाहिजे? यांमुळे आपली शिकवण्याची पद्धत प्रभावी कशी होऊ शकते?
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
यहोवा आजारी लोकांना सांभाळतो
आजारपण किंवा संकटाचा सामना करत असलेल्या यहोवाच्या विश्वासू सेवकांना स्तोत्र ४१ मधील दाविदाने यहोवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या शब्दांतून बळ मिळेल.
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
मनानं खचलेल्यांना यहोवा सोडणार नाही
स्तोत्र ५१ मध्ये दावीद, गंभीर पापामुळे त्याच्यावर किती परिणाम झाला होता त्याचं वर्णन करतो. कोणत्या गोष्टीमुळे यहोवाबरोबरचा बिघडलेला नातेसंबंध तो पुन्हा जोडू शकला?
ख्रिस्ती जीवन
द किंग्डम—१०० इयर्स अॅण्ड काऊंटिंग
सन १९१४ पासून देवाच्या राज्याने काय साध्य केलं आहे त्यावर चर्चा करण्यासाठी प्रश्नांचा उपयोग करा.
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
आपला भार यहोवावर टाका
स्तोत्र ५५:२२ मधील देवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या दाविदाच्या शब्दांवरून आपल्याला समस्या किंवा चिंतांना तोंड देण्यास मदत मिळू शकते.
ख्रिस्ती जीवन
“देव माझा साहाय्यकर्ता आहे”
दाविदाने यहोवाच्या अभिवचनाबद्दल त्याची स्तुती केली. बायबलमधील कोणत्या वचनांमुळे तुम्हाला, कठीण काळात तग धरून राहण्यास मदत झाली आहे?