व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नमुना सादरीकरणं

नमुना सादरीकरणं

जगावर खरेतर कोणाचे नियंत्रण आहे? (T-33 पान १)

प्रश्न: आज जगावर कुणाचं नियंत्रण आहे, असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? पुष्कळ लोक म्हणतात, ‘देवाचं नियंत्रण आहे.’ शास्त्रवचनांत याबद्दल काय म्हटलं आहे ते मी तुम्हाला दाखवलं तर चालेल का?

वचन: १ योहा ५:१९

सादरता: या पत्रिकेत तुम्हाला याबद्दलची अधिक माहिती वाचायला मिळेल.

जगावर खरेतर कोणाचे नियंत्रण आहे? (T-33 पान ४)

प्रश्न: पुष्कळ लोकांना वाटतं, की या जगावर देवाचं नियंत्रण आहे. पण मग देवाचं नियंत्रण असतं तर जगात इतकं दुःख असतं का? देव जेव्हा या जगाची सत्ता त्याच्या हातात घेईल तेव्हा तो काय करण्याचं अभिवचन देतो, याबद्दलचं एक शास्त्रवचन मी तुम्हाला दाखवलं तर चालेल का?

वचन: स्तो ३७:१०, ११

सादरता: आज जगावर कुणाचं नियंत्रण आहे आणि भविष्यात काय होणार आहे, याबद्दलची माहिती या पत्रिकेत दिली आहे.

पत्रिका

प्रश्न: हा प्रश्न कधी तुमच्या मनात आला होता का? [पत्रिकेच्या पहिल्या पानावरील प्रश्न दाखवा.] तुमचं काय मत आहे?

वचन: [पत्रिकेच्या पान २ वरील वचन दाखवा]

सादरता: या शास्त्रवचनांतील माहितीचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो, ते या पत्रिकेत सांगितलं आहे.

स्वतःचं सादरीकरण तयार करा

वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.