मनानं खचलेल्यांना यहोवा सोडणार नाही
संदेष्टा नाथान याने, दाविदाने बथशेबाबरोबर केलेलं पाप त्याच्या लक्षात आणून दिलं आणि यानंतर दाविदाने ५१ वे स्तोत्र लिहिले. त्याचा विवेक त्याला खूप बोचत होता. त्याने नम्रपणे स्वतःची चूक कबूल केली.—२शमु १२:१-१४.
दाविदाने घोर पाप केले असले तरी, यहोवाबरोबर बिघडलेला त्याचा नातेसंबंध सुधरण्याची आशा होती
-
पश्चात्ताप करून पाप कबूल करेपर्यंत त्याचा विवेक त्याला खूप सलत होता
-
देव आपल्यावर किती नाराज झाला असेल या विचारानं तो अस्वस्थ झाला; आपली जणू काय हाडं मोडली आहेत, असं त्याला वाटत होतं
-
त्याला देवाकडून क्षमा हवी होती आणि त्याच्याबरोबर तुटलेला नातेसंबंध पुन्हा जोडायची तीव्र इच्छा होती. पापामुळे गमावलेला आनंद त्याला पुन्हा मिळवायचा होता
-
आज्ञांचं पालन करण्याची इच्छा मनात जागी होण्यास मदत करण्यासाठी त्याने यहोवाला नम्रपणे प्रार्थना केली
-
यहोवा आपल्याला नक्की क्षमा करेल, अशी त्याला खातरी होती