आपला भार यहोवावर टाका
दाविदाला त्याच्या जीवनात अनेक परीक्षांना तोंड द्यावं लागलं होतं. यामुळे त्याचं जीवन उद्ध्वस्त झालं. ५५ वं स्तोत्र लिहून होईपर्यंत त्याला पुढं चित्रांत दाखवलेल्या परीक्षांना सामोरं जावं लागलं होतं:
-
अपमान
-
छळ
-
दोषी भावना
-
कौटुंबिक संकट
-
आजारपण
-
विश्वासघात
दाविदावर आलेल्या या परीक्षा सहनशक्ती-पलीकडच्या आहेत असं वाटत असलं तरी त्याने धैर्यानं त्यांना तोंड दिलं. आज त्याच्याप्रमाणे ज्यांना वाटतं त्यांना तो देवाच्या प्रेरणेनं असा सल्ला देतो: “तू आपला भार परमेश्वरावर टाक.”
या वचनाचा आपण आपल्या जीवनात अवलंब कसा करू शकतो?
-
कोणतीही समस्या आली किंवा मनात चिंता असेल तर यहोवाला ते निसंकोचपणे प्रार्थनेत सांगा
-
यहोवाचे वचन बायबल आणि त्याची संघटना यांच्याकडून मार्गदर्शन मिळवा
-
बायबल तत्त्वांचं उल्लंघन न करता परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला जमतील तशी व्यावहारिक पावलं उचला