ख्रिस्ती जीवन
“देव माझा साहाय्यकर्ता आहे”
दाविदाच्या जीवनातील कठीण प्रसंगी, त्याच्या मनात आलेल्या भावनांबद्दल स्तोत्र ५२-५९ मध्ये आपल्याला वाचायला मिळतं. या सर्व प्रसंगी त्याने यहोवावरील त्याचा भरवसा कमी होऊ दिला नाही. (स्तो ५४:४; ५५:२२) यहोवाच्या अभिवचनाची प्रशंसादेखील त्याने केली. (स्तो ५६:१०) आपणसुद्धा दाविदाप्रमाणे विश्वास आणि भरवसा दाखवतो का? आपल्यासमोर कठीण प्रसंग येतात तेव्हा आपणही देवाच्या वचनातून मार्गदर्शन मिळवतो का? (नीति २:६) बायबलमधील कोणत्या वचनांमुळे मदत मिळाली जेव्हा तुम्ही:
-
निराश किंवा दुःखी होता?
-
आजारी होता?
-
इतरांनी मन दुःखावल्यामुळे नाराज झाला होता?
-
छळाचा सामना करत होता?