व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | स्तोत्रे ३४-३७

यहोवावर भरवसा ठेवा आणि चांगलं कार्य करत राहा

यहोवावर भरवसा ठेवा आणि चांगलं कार्य करत राहा

दुष्कर्म्यांचा “हेवा करू नको.”

३७:१, २

  • दुष्ट लोकांना यशस्वी होताना आपण पाहतो. पण त्यांचं हे यश तात्पुरत्या काळासाठी आहे. त्यामुळे यहोवाची सेवा करताना आपण त्यांच्याकडे पाहून आपलं मन विचलित होऊ देऊ नये. आपलं लक्ष आपण आध्यात्मिक आशीर्वादांवर व ध्येयांवर केंद्रित ठेवू या

“परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग”

३७:३

  • आपल्या मनात कसल्याही चिंता आल्या तरी यहोवा आपल्या पाठीशी उभा आहे, असा भरवसा आपण बाळगला पाहिजे. तो आपल्याला विश्वासू राहण्यास मदत करेल

  • देवाच्या राज्याबद्दल आनंदाची बातमी लोकांना सांगण्याच्या कामात स्वतःला व्यस्त ठेवा

परमेश्वराच्या ठायी आनंद कर

३७:४

  • देवाचं वचन वाचण्यासाठी एक वेळ ठरवा आणि वाचलेल्या भागावर मनन करा. वाचलेल्या भागातून मला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं ते समजण्याच्या हेतूनं मनन करा

“आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे”

३७:५, ६

  • समोर येणारी कोणत्याही प्रकारची समस्या सोडवण्यास यहोवा तुम्हाला मदत करू शकतो, हा भरवसा बाळगा

  • विरोध, छळ होताना किंवा तुमच्याबद्दल लोकांचा गैरसमज होतो तेव्हा तुमचं आचरण उत्तम असू द्या

“परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा; त्याची प्रतिक्षा शांतपणे करत राहा”

३७:७-९

  • भावनांच्या भरात येऊन असं काहीही करू नका ज्यामुळे तुमचा आनंद निघून जाईल किंवा यहोवाबरोबर असलेला तुमचा नातेसंबंध खराब होईल

“लीन जन पृथ्वीचे वतन पावतील”

३७:१०, ११

  • नम्र व्हा आणि तुम्हाला सहन करावा लागत असलेला अन्याय यहोवा काढून टाकेल, असा भरवसा बाळगून थांबून राहा

  • बांधवांना साथ द्या आणि निराश झालेल्यांना, अगदी जवळ येऊन ठेपलेल्या देवाच्या नव्या जगाविषयी सांगून त्यांचं सांत्वन करा

मसीही राज्य अगणित आशीर्वाद देणार आहे