ख्रिस्ती जीवन
सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—शिकवण्यासाठी व्हिडिओंचा वापर करा
हे का महत्त्वाचं:
व्हिडिओ पाहिल्यावर थेट आपल्या हृदयावर परिणाम होतो आणि हृदयावर पडणारी छाप ही कायमची असते. यहोवाने देखील शिकवताना दृश्य चित्रांचा उपयोग करण्याच्याबाबतीत उत्तम उदाहरण मांडलं.—प्रेकृ १०:९-१६; प्रक १:१.
देवाला नाव आहे का?, बायबलचा लेखक कोण आहे? आणि बायबल देवाकडून असल्याची खातरी आपण का बाळगू शकतो? हे व्हिडिओ आनंदाची बातमी माहितीपत्रकातील धडा २ व ३ यांजशी संबंधित आहेत. बायबलचा अभ्यास का करावा?, बायबल अभ्यास कसा चालवला जातो? आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात? हे व्हिडिओ लोकांना बायबलचा अभ्यास करण्याचं किंवा सभांना येण्याचं उत्तेजन देतात. आपले काही व्हिडिओ मोठे आहेत. बायबल अभ्यासाच्या वेळी शिकवण्यासाठी आपण यांचादेखील उपयोग करू शकतो.—आपली राज्य सेवा ५/१३ ३.
हे कसं करावं:
-
घरमालकाला तुम्ही दाखवणार असलेला व्हिडिओ आधीच डाऊनलोड करून घ्या
-
त्यांना विचारण्यासाठी एक किंवा दोन प्रश्न तयार करा ज्यांचं उत्तर व्हिडिओत आहेत
-
त्यांच्यासोबत व्हिडिओ पाहा
-
मुख्य मुद्द्यांची एकत्र चर्चा करा
या महिन्यादरम्यान हे करून पाहा:
-
आपल्या पत्रिकांच्या शेवटच्या पानावर कोड दिला आहे. तो घरमालकाला दाखवा आणि सांगा, की तो स्कॅन केल्यास, बायबलचा अभ्यास का करावा? हा व्हिडिओ पाहता येईल.
-
बायबल देवाकडून असल्याची खातरी आपण का बाळगू शकतो? हा व्हिडिओ दाखवा आणि आनंदाची बातमी माहितीपत्रकातील धडा ३ दाखवून माहितीपत्रक सादर करा.