व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

पालकांनो, आपल्या मुलांना यशस्वी होण्याची सर्वात चांगली संधी द्या

पालकांनो, आपल्या मुलांना यशस्वी होण्याची सर्वात चांगली संधी द्या

देवभीरू पालकांना मनापासून वाटत असतं की आपली मुलं यहोवा देवाचे विश्‍वासू सेवक बनावेत. यासाठी पालकांनी आपल्या मुलांच्या मनात अगदी लहानपणापासूनच बायबलच्या शिकवणी ठसवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. (अनु ६:७; नीत २२:६) यासाठी पालकांना त्याग करण्याची गरज असली तरी ते घेत असलेल्या मेहनतीचे खूप चांगले परिणाम घडून येतात.—३यो ४.

योसेफ आणि मरीयाच्या उदाहरणावरून पालक खूप काही शिकू शकतात. ते “दरवर्षी, वल्हांडण सणासाठी यरुशलेमला” जायचे, कारण त्यांची तशी रीत होती. यासाठी त्यांना मेहनत घ्यावी लागायची आणि पैसेही खर्च करावे लागायचे. असं असलं तरीही ते जायचे. (लूक २:४१) कारण त्यांनी आपल्या कुटुंबाच्या आध्यात्मिक गरजांना प्राधान्य दिलं. त्याच प्रकारे, आज पालकदेखील मुलांनी आपल्या जीवनात योग्य निर्णय घेण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन करू शकतात. यासाठी त्यांनी आपल्या शब्दांनी आणि स्वतःच्या उदाहरणाने मिळेल त्या संधीचा उपयोग करून त्यांना शिकवलं पाहिजे.—स्तो १२७:३-५.

त्यांनी प्रत्येक संधीचं सोनं केलं हा व्हिडिओ पाहा आणि त्यानंतर खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • जोन आणि शॅरन शिलर यांनी मुलांचं संगोपन करताना यहोवाच्या सेवेला कसं प्रथमस्थानी ठेवलं?

  • पालकांनी प्रत्येक मुलाच्या गरजा लक्षात घेऊन त्याला शिकवणं, त्याचं मार्गदर्शन करणं आणि त्याला सुधारणं का गरजेचं आहे?

  • पालक आपल्या मुलांना विश्‍वासाच्या परीक्षांसाठी कसं तयार करू शकतात?

  • आपल्या मुलांना आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी तुम्ही यहोवाच्या संघटनेकडून मिळणाऱ्‍या कोणत्या साधनांचा वापर केला आहे?

तुमच्या कुटुंबात आध्यात्मिक कार्यांना प्राधान्य द्या