ख्रिस्ती जीवन
सोशल नेटवर्किंगचे धोके टाळा
हे का महत्त्वाचं: सोशल नेटवर्किंग इतर कोणत्याही साधनांसारखं मदतीचं किंवा धोक्याचं ठरू शकतं. काही ख्रिश्चनांनी सोशल नेटवर्किंगचा वापर न करण्याचं ठरवलं आहे. तर इतर काही ख्रिश्चनांनी, नातेवाइकांच्या आणि मित्रांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल नेटवर्किंगचा वापर करण्याचं ठरवलं आहे. आपण सोशल नेटवर्किंगचा वापर सुज्ञपणे करू नये अशी सैतानाची इच्छा आहे. आणि आपण जर सैतानाच्या इच्छेनुसार केलं तर आपलं नाव खराब होऊ शकतं आणि यहोवासोबतचं आपलं नातंही बिघडू शकतं. येशूने देवाच्या वचनांत दिलेल्या तत्त्वांचा वापर धोके ओळखून ते टाळण्यासाठी केला. आपणही सोशल नेटवर्किंग वापरण्याच्या बाबतीत बायबलची तत्त्वं लक्षात घेऊ शकतो.—लूक ४:४, ८, १२.
कोणते धोके टाळावेत:
-
सोशल मिडियात पूर्णपणे गुंतून जाणं. सोशल नेटवर्क किंवा सोशल मिडिया यांवर तास न् तास घालवण्याद्वारे आपण यहोवाच्या सेवेसाठी असलेला आपला मौल्यवान वेळ वाया घालवतो
बायबलची तत्त्वं: इफि ५:१५, १६; फिलि १:१०
-
ख्रिश्चनांसाठी अयोग्य असलेल्या गोष्टी पाहणं. उत्तेजक चित्रं पाहिल्याने एका व्यक्तीला पोर्नोग्राफी बघण्याचं व्यसन लागू शकतं किंवा त्याच्याकडून अनैतिक कार्यही घडू शकतं. धर्मत्यागी साहित्य किंवा ब्लॉग वाचल्याने एका व्यक्तीच्या विश्वासाला तडा जाऊ शकतो
बायबलची तत्त्वं: मत्त ५:२८; फिलि ४:८
-
अनुचित प्रतिक्रिया किंवा फोटो पोस्ट करणं. आपलं हृदय कपटी असल्यामुळे आपल्याला कदाचित अनुचित प्रतिक्रिया किंवा फोटो पोस्ट करण्याची इच्छा होऊ शकते. पण असं केल्यामुळे एखाद्याचं नाव खराब होऊ शकतं किंवा त्याचा विश्वास कमकुवत होऊ शकतो
बायबलची तत्त्वं: रोम १४:१३; इफि ४:२९
सोशल नेटवर्कचा सावधपणे वापर करा हा व्हिडिओ पाहा आणि त्यानंतर खाली दिलेल्या परिस्थिती कशा टाळता येतील त्यावर चर्चा करा: