ख्रिस्ती जीवन
ख्रिस्ताचं जवळून अनुकरण करा
आपण येशूच्या उदाहरणाचं जवळून अनुकरण केलं पाहिजे. खासकरून, आपल्याला परीक्षांचा आणि छळाचा सामना करावा लागतो तेव्हा. (१पेत्र २:२१-२३) येशूचा जरी अपमान करण्यात आला आणि त्याला दुःखाचा सामना करावा लागला तरीही त्याने कधीच सूड घेतला नाही. (मार्क १५:२९-३२) त्याला कशामुळे धीर धरायला मदत झाली? यहोवाची इच्छा पूर्ण करण्याचा पक्का निर्धार केल्यामुळे त्याला मदत झाली. (योह ६:३८) “जो आनंद त्याच्यासमोर होता” त्यावर त्याने लक्ष केंद्रित केलं.—इब्री १२:२.
आपल्या विश्वासामुळे आपला छळ होतो तेव्हा आपली प्रतिक्रिया काय असते? खरे ख्रिस्ती “वाइटाबद्दल कोणाचे वाईट” करत नाहीत. (रोम १२:१४, १७) ख्रिस्ताप्रमाणेच आपणही जेव्हा धीराने दुःखाचा सामना करतो तेव्हा आपण आनंदी होतो कारण आपल्याला माहीत असतं की आपल्याला देवाची स्वीकृती आहे.—मत्त ५:१०-१२; १पेत्र ४:१२-१४.
यहोवाचं नाव सर्वात महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ पाहा आणि त्यानंतर खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
-
सिस्टर पोएटझिंगर यांनी एकांत कारावासात असताना आपल्या वेळेचा सदुपयोग कसा केला?
-
वेगवेगळ्या छळ छावण्यांमध्ये असताना पोएटझिंगर जोडप्याला काय सहन करावं लागलं?
-
धीराने समस्यांचा सामना करायला त्यांना कशामुळे मदत मिळाली?