व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

यहोवाला काय वाटेल?

यहोवाला काय वाटेल?

कोणताही लहान-मोठा निर्णय घेण्याआधी त्याबद्दल ‘यहोवाला काय वाटेल,’ असा प्रश्‍न आपण स्वतःला विचारतो का? यहोवाचे विचार आपण कधीच पूर्णपणे समजू शकत नाही, पण ‘प्रत्येक चांगल्या कामासाठी’ आपण सज्ज व्हावं म्हणून आवश्‍यक ती माहिती तो बायबलमधून पुरवतो. (२ती ३:१६, १७; रोम ११:३३, ३४) येशूने यहोवाची इच्छा समजून घेतली आणि तिला आपल्या जीवनात पहिलं स्थान दिलं. (योह ४:३४) आपणही येशूचं अनुकरण करून असे निर्णय घेण्याचा प्रयत्न करू या, ज्यामुळे यहोवाचं मन आनंदित होईल.—योह ८:२८, २९; इफि ५:१५-१७.

यहोवाची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहा  (लेवी १९:१८) हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • आपण आपल्या जीवनात बायबल तत्त्वं का लागू केली पाहिजेत?

  • संगीत निवडताना कोणती बायबल तत्त्वं आपल्याला मदत करतील?

  • पेहराव आणि केसांची स्टाईल निवडताना कोणती बायबल तत्त्वं आपल्याला मदत करतील?

  • जीवनातल्या आणखी कोणत्या क्षेत्रात आपण बायबल तत्त्वांचा वापर करणं गरजेचं आहे?

  • यहोवाची इच्छा समजून घेण्याची क्षमता आपण कशी वाढवू शकतो?

माझ्या निर्णयांवरून यहोवाशी असलेल्या माझ्या नातेसंबंधाबद्दल काय दिसून येतं?