व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

विचार करून मनोरंजन निवडा

विचार करून मनोरंजन निवडा

आपण विचार करून मनोरंजनाची निवड का केली पाहिजे? कारण आपण जेव्हा एखादा चित्रपट पाहण्याची, गाणं ऐकण्याची, वेबसाईट पाहण्याची, पुस्तक वाचण्याची किंवा एखादा व्हिडिओ गेम खेळण्याची निवड करतो, तेव्हा खरंतर आपण त्या गोष्टींनी आपलं मन भरत असतो. त्यामुळे आपण जी निवड करत असतो त्याचा परिणाम आपल्या वागण्या-बोलण्यावर होतो. पण दुःखाची गोष्ट म्हणजे सध्या जे मनोरंजन उपलब्ध आहे त्यात यहोवाला वीट आणणाऱ्‍या गोष्टींचं प्रमाण जास्त आहे. (स्तो ११:५; गल ५:१९-२१) याच कारणामुळे बायबल आपल्याला अशा गोष्टींची निवड करण्याचं उत्तेजन देतं ज्यामुळे यहोवाचा गौरव होईल.—फिलि ४:८.

मी कोणत्या प्रकारचं मनोरंजन निवडलं पाहिजे?  हा व्हिडिओ दाखवा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • प्राचीन रोममधल्या खेळांमध्ये आणि आजच्या मनोरंजनात कोणता सारखेपणा आहे?

  • मनोरंजनाची विचारपूर्वक निवड करण्यासाठी मंडळीतले बंधूभगिनी तरुणांना कशी मदत करू शकतात?

  • मनोरंजनाच्या बाबतीत रोमकर १२:९ मधला सल्ला आपण कसा लागू करू शकतो?

  • तुमच्या भागात योग्य मनोरंजनासाठी कोणते काही पर्याय उपलब्ध आहेत?