व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | गलतीकर ४-६

आपल्यासाठी महत्त्वाचं असणारं एक “लाक्षणिक” नाटक!

आपल्यासाठी महत्त्वाचं असणारं एक “लाक्षणिक” नाटक!

४:२४-३१

नियमशास्त्राच्या करारापेक्षा नवा करार कशा प्रकारे श्रेष्ठ आहे हे स्पष्ट करण्यासाठी प्रेषित पौलने या “लाक्षणिक” नाटकाचा वापर केला. ख्रिस्त आणि त्याच्यासोबत असणाऱ्‍या सहवारसदारांच्या प्रेमळ अधिकाराखाली सर्व मानवजातीला पाप, अपरिपूर्णता, दुःख आणि मृत्यूपासून सुटका मिळवण्याची आशा आहे.—यश २५:८, ९.

 

हागार दासी

नियमशास्त्राच्या अधीन असणारे वास्तविक इस्राएल राष्ट्र आणि त्याची राजधानी यरुशलेम

स्वतंत्र स्त्री सारा

देवाच्या संघटनेचा स्वर्गातला भाग म्हणजे वरचं यरुशलेम

हागारची ‘मुलं’

येशूचा छळ करणारे व त्याला नाकारणारे यहुदी लोक (नियमशास्त्राद्वारे यहोवाशी बांधले गेलेले लोक)

साराची ‘मुलं’

ख्रिस्त आणि आत्म्याने अभिषेक केलेले १,४४,००० जण

नियमशास्त्राच्या दास्यात

वंशाने इस्राएली असणाऱ्‍या या लोकांना, आपण पापाचे दास आहोत या गोष्टीची आठवण नियमशास्त्राने करून दिली

नव्या करारामुळे स्वातंत्र्य मिळतं

येशूच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवल्यामुळे नियमशास्त्राच्या बंधनातून मुक्‍तता मिळते