ख्रिस्ती जीवन
अनुभवी भाऊबहिणींकडून तुम्ही काय शिकू शकता?
आपल्या मंडळ्यांमध्ये असे बरेच भाऊबहीण असतात, ज्यांनी कित्येक दशकं यहोवाची सेवा केली आहे. यहोवावर त्यांनी दाखवलेल्या भक्कम विश्वासातून आपण बरंच काही शिकू शकतो. आपण त्यांना यहोवाच्या संघटनेचा इतिहास विचारू शकतो. शिवाय, त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं आणि यहोवाच्या मदतीने त्यांनी त्यांवर कशी मात केली, हेसुद्धा आपण त्यांना विचारू शकतो. अशा एखाद्या भावाला किंवा बहिणीला आपण आपल्या कौटुंबिक उपासनेसाठी घरी बोलवू शकतो आणि त्यांना त्यांचे अनुभव विचारू शकतो.
तुम्हीसुद्धा जर एक अनुभवी ख्रिस्ती असाल तर मंडळीतल्या तरुणांसोबत तुमच्या विश्वासाबद्दल मनमोकळेपणाने बोला. याकोब आणि योसेफनेसुद्धा त्यांच्या कुटुंबातल्या तरुणांना आपल्या अनुभवांबद्दल सांगितलं. (उत्प ४८:२१, २२; ५०:२४, २५) पुढे कुटुंबप्रमुखांनीसुद्धा देवाच्या अद्भुत कार्यांबद्दल आपल्या मुलांना शिकवावं अशी अपेक्षा यहोवाने केली. (अनु ४:९, १०; स्तो ७८:४-७) आज आपल्या काळातसुद्धा, पालक आणि मंडळीतले इतर जण, यहोवाने त्याच्या संघटनेद्वारे केलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल त्यांच्या पुढच्या पिढीला सांगू शकतात.
आपल्या कामावर बंदी असतानाही एकता टिकवून ठेवणं हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
-
आपल्या कामावर बंदी असलेल्या काही देशांमधल्या बांधवांना ऑस्ट्रियाच्या शाखा कार्यालयाने कशी मदत केली?
-
या देशांतल्या बांधवांनी कशा प्रकारे आपला विश्वास मजबूत केला?
-
रुमानियातल्या काही प्रचारकांनी यहोवाची संघटना का सोडली आणि ते संघटनेकडे कशा प्रकारे परत आले?
-
या अनुभवांमुळे तुमचा विश्वास कसा मजबूत होतो?