नमुना सादरीकरणं
भविष्याबद्दल तुम्ही काय विचार करता? (T-31)
प्रश्न: तुम्हाला असं भविष्य आवडेल का जिथं समाधानकारक काम असेल, आजारपण नसेल, समस्या नसतील आणि मित्रांसोबत, कुटुंबासोबत तुम्हाला सार्वकालिक जीवन जगता येईल.
वचन: स्तो. ३७:११, २९
सादरता: हे कसं होणार आहे, याबद्दल अधिक माहिती या पत्रिकेत दिली आहे.
सत्य शिकवा
प्रश्न: आपल्यावर येणाऱ्या समस्या देवामुळे आहेत की आणखी कोणत्या कारणांमुळे?
वचन: ईयो. ३४:१०
सत्य: देव आपल्यावर येणाऱ्या समस्यांसाठी कारणीभूत नाही. याउलट तीन कारणांमुळे आपल्यावर दु:ख आणि समस्या येतात. एक म्हणजे सैतानामुळे. दुसरं म्हणजे अशा लोकांमुळे जे चुकीचे निर्णय घेतात आणि तिसरं कारण म्हणजे जेव्हा आपण चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी असतो. पण जेव्हा आपल्यावर समस्या येतात तेव्हा देव आपली मदत करतो. कारण त्याला आपली काळजी आहे.
बायबलचा अभ्यास का करावा? (व्हिडिओ)
प्रश्न: या जगावर देवाचं नियंत्रण आहे, असं तुम्हाला वाटतं का? [उत्तरासाठी थांबा.] बायबलमध्ये जे सांगितलं आहे ते ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. या व्हिडिओमध्ये थोडक्यात त्याबद्दल सांगितलं आहे. [व्हिडिओ दाखवा.]
सादरता: देवाने दुःख आणि समस्या का राहू दिल्या आणि तो त्याबद्दल काय करणार आहे, हे या माहितीपत्रकाच्या ८ व्या अध्यायात सांगितलं आहे. [देवाकडून आनंदाची बातमी हे माहितीपत्रक सादर करा.]
स्वतःचं सादरीकरण तयार करा
वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.