मसीहाने भविष्यवाणी पूर्ण केली
येशूचा जन्म होण्याच्या कित्येक शतकांआधी यशयाने भविष्यावाणी केली की, मसीहा “यार्देनेच्या पलीकडील प्रांत, विदेशी लोकांचे मंडळ (गालील)” इथं जाऊन प्रचार करेल. येशूने जेव्हा गालीलमध्ये सर्व ठिकाणी सुवार्तेचा प्रचार केला आणि लोकांना शिकवलं तेव्हा त्याने ही भविष्यवाणी पूर्ण केली.—यश. ९:१, २.
-
त्याने आपला पहिला चमत्कार केला—योहा. २:१-११. (काना)
-
आपल्या प्रेषितांना निवडलं—मार्क ३:१३, १४. (कफर्णहूम जवळ)
-
डोंगरावरील प्रवचन दिलं—मत्त. ५:१–७:२७. (कफर्णहूम जवळ)
-
एका विधवेच्या एकुलत्या एक मुलाचं पुनरुत्थान केलं—लूक ७:११-१७. (नाईन)
-
पुनरुत्थान झाल्यावर तो जवळपास ५०० शिष्यांना दिसला—१ करिंथ. १५:६. (गालील)