व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

“हा मी आहे, मला पाठव”

“हा मी आहे, मला पाठव”

यशयाच्या स्वेच्छेने सेवा करण्याच्या वृत्तीचं आपण अनुकरण केलं पाहिजे. त्याने विश्वास दाखवला आणि त्याला मिळालेल्या नेमणुकीबद्दल सर्व माहिती नसतानाही, त्याने ती लगेच स्वीकारली. (यश. ६:८) सुवार्तिकांची जिथं जास्त गरज आहे, तिथं जाऊन सेवा करण्यासाठी तुम्ही जीवनात फेरबदल करू शकता का? (स्तो. ११०:३) पण यासाठी “खर्चाचा अंदाज” बांधणं खरंच गरजेचं आहे. (लूक १४:२७, २८) असं असलं तरी आपण प्रचार कार्यासाठी त्याग करायला तयार राहिलं पाहिजे. (मत्त. ८:२०; मार्क १०:२८-३०) जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करणं या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, की यहोवाची सेवेत आपण करत असलेल्या त्यागापेक्षा, आपल्याला कितीतरी जास्त पटीने आशीर्वाद अनुभवायला मिळतात.

व्हिडिओ पाहिल्यानंतर पुढील प्रश्नांची उत्तरं द्या:

  • एक्वाडॉरला जाऊन सेवा करण्यासाठी, विल्यम्स कुटुंबातल्या सदस्यांनी कोणकोणते वैयक्तिक त्याग केले?

  • कुठे सेवा करायची हे ठरवताना त्यांनी कोणत्या गोष्टींचा विचार केला?

  • त्यांना कोणते आशीर्वाद अनुभवायला मिळाले?

  • कोणत्या ठिकाणी जास्त गरज आहे, याबद्दल अधिक माहिती आपल्याला कुठून मिळेल?

तुमच्या पुढच्या कौटुंबिक उपासनेत खालील प्रश्नांवर चर्चा करा:

  • कुटुंब म्हणून आपण आपली सेवा आणखी कशी वाढवू शकतो? (आपली राज्य सेवा ८/११ पृ. ४-६)

  • जर आपल्याला जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करणं शक्य नसेल, तर आपण कोणत्या मार्गांनी आपल्या मंडळीला मदत करू शकतो? (टेहळणी बुरूज१६.०३ पृ. २३-२५)