व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

देवाकडून मिळणाऱ्या शिक्षणामुळे पक्षपातावर मात करता येते

देवाकडून मिळणाऱ्या शिक्षणामुळे पक्षपातावर मात करता येते

यहोवा पक्षपात करत नाही. (प्रे. कृत्ये १०:३४, ३५) “तो सर्व राषट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा” बोलणाऱ्या लोकांना स्वीकारतो. (प्रकटी. ७:९) म्हणूनच ख्रिस्ती मंडळीमध्ये पक्षपात किंवा भेदभाव या गोष्टींना जागा नाही. (याको. २:१-४) देवाकडून मिळत असलेल्या शिक्षणामुळे, बऱ्याच लोकांच्या व्यक्तिमत्त्वात परिवर्तन झालेलं आहे आणि आपण एका आध्यात्मिक नंदनवनात आनंदाने राहत आहोत. (यश. ११:६-९) आपण आपल्या हृदयातून पक्षपात पूर्णपणे काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं केल्यानेच आपण देवाचं अनुकरण करणारे ठरू शकतो.—इफिस. ५:१, २.

जॉनी आणि गिडीयन: एकेकाळचे शत्रू, आता मित्र झाले. हा व्हिडिओ पाहा आणि त्यानंतर पुढील प्रश्नांची उत्तरं द्या:

  • पक्षपात आणि भेदभाव या गुणांवर मात करण्यासाठी कुठल्याही मानवी प्रयत्नांपेक्षा, देवाकडून मिळणारं शिक्षण सर्वोत्तम का आहे?

  • आपल्या आंतरराष्ट्रीय बंधुत्वाबद्दल तुम्हाला कोणती गोष्ट आवडते?

  • जेव्हा आपण ख्रिस्ती एकता राखतो तेव्हा यहोवाची महिमा कशी होते?