“परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल”
ही भविष्यवाणी इस्राएली लोकांना कशी लागू झाली?
-
इस्राएली लोकांना, बॅबिलोनच्या बंदीवासातून परत येताना किंवा त्यांच्या पुनर्स्थापित देशात कोणत्याही जंगली पशूंना किंवा पशूंसारख्या माणसांना घाबरण्याची गरज नव्हती.—एज्रा ८:२१, २२.
ही भविष्यवाणी आजच्या काळात कशी लागू होते?
-
यहोवाच्या ज्ञानामुळे लोकांचं व्यक्तिमत्त्व बदलण्यास मदत झाली आहे. आधी हिंसक असलेले लोक आता शांत स्वभावाचे झाले आहेत. यहोवाच्या ज्ञानामुळे जागतिक स्तरावर आध्यात्मिक नंदनवन निर्माण झालं आहे.
ही भविष्यावाणी येणाऱ्या भविष्य काळात कशी पूर्ण होईल?
-
देवाच्या मूळ उद्देशानुसार या पूर्ण पृथ्वीचं एका सुरक्षित, शांतीपूर्ण नंदनवनात रूपांतर होईल. त्या वेळी कुठलाही प्राणी किंवा मनुष्य हिंसक नसेल.
देवाच्या ज्ञानामुळे पौल बदलला
-
तो जेव्हा परूशी होता तेव्हा त्याच्यात पशू सारखे गुण होते.—१ तीम. १:१३.
-
अचूक ज्ञानामुळे त्याचं व्यक्तिमत्त्व पूर्णपणे बदललं.—कलस्सै. ३:८-१०.