व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

“देवाच्या प्रेमात टिकून राहा” या पुस्तकाद्वारे विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत पोहचा

“देवाच्या प्रेमात टिकून राहा” या पुस्तकाद्वारे विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत पोहचा

हे का महत्त्वाचं: यहोवाने लोकांची उपासना स्वीकारावी, यासाठी त्यांनी त्याचे स्तर शिकले पाहिजेत आणि त्यानुसार जगलं पाहिजे. (यश. २:३, ४) “देवाचे प्रेम” हे पुस्तक बायबल अभ्यासाचं दुसरं पुस्तक आहे. आपल्या रोजच्या जीवनात बायबलमधली तत्त्वं कशी लागू करता येतील हे समजण्यास, हे पुस्तक विद्यार्थ्याला मदत करतं. (इब्री. ५:१४) आपण त्यांना शिकवताना, त्यांच्या हृदयापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्यामुळे त्यांना आपल्या जीवनात बदल करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.—रोम. ६:१७.

हे कसं करावं:

  • विद्यार्थ्याला लक्षात ठेवून, चांगली तयारी करा. विचार करायला लावणारे प्रश्न विचारा, ज्यामुळे चर्चा करत असलेल्या विषयाबद्दल त्याला कसं वाटतं व त्याचे काय विचार आहेत हे जाण्यासाठी तुम्हाला मदत होईल.—नीति. २०:५; सेवा स्कूल पृ. २५९

  • अभ्यास करतेवेळी पुस्तकात दिलेल्या सर्व चौकटींचा वापर करा. यामुळे विद्यार्थ्याला समजेल की बायबल तत्त्वं जीवनात लागू केल्याने काय फायदे होतात.

  • तुम्ही विद्यार्थ्यासाठी निर्णय घेऊ नका. याऐवजी आपल्या विवेकाचा वापर करून तो कसे निर्णय घेऊ शकतो हे त्याला शिकवा.—गलती. ६:५

  • विद्यार्थ्याला कोणती बायबल तत्त्वं लागू करण्यासाठी मदतीची गरज आहे हे ओळखा. यहोवावर असलेल्या त्याच्या प्रेमामुळे त्याला जीवनात बदल करण्याचं प्रोत्साहन द्या.—नीति. २७:११; योहा. १४:३१