व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यशया १-५

आपण परमेश्वराच्या पर्वतावर जाऊ

आपण परमेश्वराच्या पर्वतावर जाऊ

:२, ३

“शेवटल्या दिवसांत”

आपण जगत आहोत त्या दिवसात

“परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर”

यहोवाची उच्च आणि शुद्ध उपासना

“त्याकडे सर्व राष्ट्रांतील लोक लोटतील”

जे खरी उपासना स्वीकारतील ते एकत्र येतील

“चला, आपण परमेश्वराच्या पर्वतावर . . . चढून जाऊ”

खरे उपासक दुसऱ्यांनाही खऱ्या उपासनेसाठी आमंत्रण देतात

“तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू”

आपल्या वचनाद्वारे यहोवा त्याचे मार्ग आपल्याला शिकवतो आणि त्यावर चालण्यासाठी मदत करतो

२:४

“ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत”

युद्धातल्या शस्त्रांचं रूपांतर शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या अवजारात होईल असं यशयाने म्हटलं. याचा अर्थ यहोवाचे लोक शांतीने राहतील. यशयाच्या दिवसात कोण-कोणती अवजारं वापरली जायची?

“तलवारी मोडून त्यांचे फाळ करतील”

नांगराला फाळ लावला जायचा, त्यामुळे जमीन नीट नांगरता यायची. काही फाळ धातूंनी बनलेले असायचे.—१ शमु. १३:२०.

“भाल्याच्या कोयत्या करतील”

हे वळणदार धातूचं पातं आणि लाकडाची मूठ असलेलं हत्यार असायचं. याने वेली छाटल्या जायच्या.—यश. १८:५.