ख्रिस्ती जीवन
सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—“योग्य मनोवृत्ती” असणाऱ्यांना शिष्य बनण्यासाठी मदत करणं
हे का महत्त्वाचं: यहोवा “सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती असणाऱ्या” लोकांच्या मनात सत्याचं बी वाढावं यासाठी त्यांना मदत करतो. (प्रेका १३:४८; १कर ३:७) जे लोक शिकलेल्या गोष्टी आपल्या जीवनात लागू करतात त्यांना मदत करण्यावर आपण आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. असं करण्याद्वारे आपण यहोवासोबत काम करत असतो. (१कर ९:२६) उद्धार मिळवण्यासाठी बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे हे बायबल विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे. (१पेत्र ३:२१) आपल्या जीवनात बदल करायला, प्रचार व शिकवण्याचं कार्य करायला आणि यहोवाला आपलं जीवन समर्पित करायला आपण त्यांना शिकवतो. असं करण्याद्वारे आपण बायबल विद्यार्थ्यांना शिष्य बनायला मदत करतो.—मत्त २८:१९, २०.
हे कसं करावं:
-
विद्यार्थ्यांना आठवण करून द्या की बायबल अभ्यासाचा उद्देश यहोवाला ‘ओळखणं’ आणि त्याचं मन आनंदित करणं हा आहे.—योह १७:३
-
आध्यात्मिक प्रगती व्हावी म्हणून त्यांना वाईट सवयी आणि वाईट संगती यांसारख्या अडथळ्यांवर मात करायला मदत करा
-
बाप्तिस्म्याच्या आधी आणि नंतरसुद्धा त्यांना आध्यात्मिक रीत्या मजबूत करा आणि प्रोत्साहन द्या.—प्रेका १४:२२
यहोवा देव तुम्हाला मदत करेल हा व्हिडिओ पाहा आणि त्यानंतर खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
-
कोणत्या गोष्टींमुळे एक व्यक्ती समर्पण आणि बाप्तिस्मा घेण्यापासून कचरू शकते?
-
आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी मंडळीतले वडील बायबल विद्यार्थ्यांना कशी मदत करू शकतात?
-
यशया ४१:१० हे वचन आपल्याला यहोवाबद्दल काय शिकवतं?
-
आपण अपरिपूर्ण असलो तरी कोणत्या गुणांमुळे यहोवाला स्वीकारयोग्य असलेली सेवा करायला आपल्याला मदत होईल?