व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

आनंदाने गीत गाऊन यहोवाची स्तुती करा

आनंदाने गीत गाऊन यहोवाची स्तुती करा

तुरुंगात असताना पौल आणि सीलाने गीत गाऊन यहोवाची स्तुती केली. (प्रेका १६:२५) यामुळे त्यांना धीर धरायला नक्कीच मदत मिळाली. आज आपल्याबाबतीत काय? सभांमध्ये गायल्या जाणाऱ्‍या राज्यगीतांमुळे आणि ब्रॉडकास्टींगवर आलेल्या गीतांमुळे आपल्याला प्रोत्साहन मिळू शकतं आणि परीक्षेत विश्‍वासू राहण्यासाठी मदत मिळू शकते. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळे यहोवाची स्तुती होते. (स्तो २८:७) आपण काही गाणी पाठ करावी असं प्रोत्साहन आपल्याला देण्यात आलं होतं. तुम्ही तसं करून पाहिलं आहे का? आपण आपल्या कौटुंबिक उपासनेत गीतांचा सराव करू शकतो आणि ती पाठही करू शकतो.

मुलं गीत गाऊन यहोवाची स्तुती करतात  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • राज्यगीतं गायल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?

  • ऑडिओ-व्हिडिओ विभागातले बंधूभगिनी गाण्यांचं रेकॉर्डिंग करण्यासाठी कशी तयारी करतात?

  • मुलं आणि त्यांचे आईवडील गाण्यांच्या रेकॉर्डिंगची तयारी कशी करतात?

  • तुमची आवडती राज्यगीतं कोणती आहेत आणि का?