देवाच्या वचनाच्या आधारावर एकमताने घेतलेला निर्णय
ही परिस्थिती ज्या प्रकारे हातळण्यात आली त्यावरून आपण काय शिकू शकतो?
१५:१, २—नम्रता आणि धीर दाखवा. स्वतःहून समस्या सोडवण्याऐवजी पौल आणि बर्णबा निर्देशनांसाठी देवाच्या संघटनेवर अवलंबून राहिले.
१५:२८, २९—देवाच्या संघटनेवर भरवसा ठेवा. यहोवा त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आणि ख्रिस्त येशूद्वारे मार्गदर्शन देईल याची मंडळीला खातरी होती.
१६:४, ५—आज्ञा पाळा. नियमन मंडळाकडून मिळालेल्या निर्देशनाचं पालन केल्यामुळे मंडळ्या वाढत गेल्या.