ख्रिस्ती जीवन
सेवाकार्यातील आपली कौशल्यं सुधारण्यासाठी—परिस्थितीनुसार फेरबदल करा
हे का महत्त्वाचं: अभिषिक्त जन आणि दुसरी मेंढरं सर्व प्रकारच्या लोकांना “जीवनाचे पाणी” मोफत घ्यायचं आमंत्रण देत आहेत. (प्रक २२:१७) आज्ञाधारक मानवांना पाप आणि मृत्यूपासून सोडवण्यासाठी यहोवाने केलेल्या सर्व तरतुदींना हे लाक्षणिक पाणी सूचित करतं. आपल्याला वेगवेगळ्या संस्कृतींच्या लोकांना आणि वेगवेगळे धार्मिक विश्वास असलेल्यांना मदत करायची आहे. त्यामुळे त्यांना आवडेल अशा प्रकारे आपण “सर्वकाळाचा आनंदाचा संदेश” सांगितला पाहिजे.—प्रक १४:६.
हे कसं करावं:
-
तुमच्या क्षेत्रातल्या लोकांच्या मनाला स्पर्श करेल असा विषय किंवा वचन निवडा. सुरुवात करण्यासाठी तुम्ही कदाचित चर्चेसाठी असलेल्या नमुन्यांचा किंवा तुम्हाला परिणामकारक वाटलेल्या गोष्टींचा वापर करू शकता. तुम्ही पुढे दिलेल्या प्रश्नांचाही विचार करू शकता. जसं की, कोणता विषय किंवा कोणतं वचन लोकांना आवडेल? हल्ली घडलेली अशी एखादी घटना आहे का ज्याबद्दल लोक चर्चा करत आहेत? स्त्रियांसाठी किंवा पुरुषांसाठी कोणता विषय आवडीचा असू शकतो?
-
तुमच्या क्षेत्रात ज्या पद्धतीने अभिवादन करतात तिचा वापर करून चर्चेची सुरुवात करा.—२कर ६:३, ४
-
आवड असणाऱ्या व्यक्तीला दाखवण्यासाठी आपल्या शिकवण्याच्या साधनांमध्ये कोण-कोणती प्रकाशनं आणि व्हिडिओ आहेत याची माहिती ठेवा
-
तुमच्या क्षेत्रात सहसा ज्या भाषेचे लोक भेटतात त्या भाषेत तुम्ही प्रकाशनं आणि व्हिडिओ डाऊनलोड करून ठेवू शकता
-
घरमालकाची परिस्थिती ओळखून तुमच्या विषयात फेरबदल करा. (१कर ९:१९-२३) समजा तुम्हाला जाणवतं की हल्लीच घरमालकाच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, मग तेव्हा तुम्ही काय म्हणाल?
व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा:
-
प्रचारक कोणत्या विषयावर घरमालकाशी संभाषण सुरू करतो?
-
पण घरमालकाची परिस्थिती काय होती?
-
त्या परिस्थितीत, दिलेल्या वचनांतून कोणतं वचन वापरणं सर्वात योग्य होतं आणि का?
-
तुमच्या क्षेत्रातल्या लोकांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी तुम्ही तुमच्या सादरीकरणात कशा प्रकारे फेरबदल करता?