व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

पृथ्वीने नदीला गिळून टाकलं

पृथ्वीने नदीला गिळून टाकलं

गतकाळात बऱ्‍याच वेळा जगातल्या अधिकाऱ्‍यांनी यहोवाच्या लोकांची मदत केली आहे. (एज ६:१-१२; एस्ते ८:१०-१३) आणि आधुनिक काळातसुद्धा आपण पृथ्वीला म्हणजे या व्यवस्थीकरणाच्या समजूतदार अशा मानवी घटकांना, अजगराच्या म्हणजेच सैतानाच्या छळांपासून देवाच्या लोकांचा बचाव करताना पाहिलं आहे. (प्रक १२:१६) यहोवा “संकटांतून मुक्‍त करणारा देव आहे,” त्यामुळे तो आपल्या लोकांची सुटका करण्यासाठी कधी-कधी मानवी शासकांचाही वापर करतो. —स्तो ६८:२०; नीत २१:१.

विश्‍वासामुळे तुम्हालाही तुरुंगात टाकण्यात आलं असेल तर काय? अशा वेळी यहोवा तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहे अशी शंका मनात कधीही येऊ देऊ नका. (उत्प ३९:२१-२३; स्तो १०५:१७-२०) तर तुम्हाला तुमच्या विश्‍वासाचं प्रतिफळ नक्की मिळेल अशी खातरी बाळगा. शिवाय, तुमच्या या उदाहरणामुळे जगभरातल्या भाऊबहिणींना एकनिष्ठ राहायचं प्रोत्साहनही मिळेल.—फिलि १:१२-१४; प्रक २:१०.

कोरियातल्या बांधवांची तुरुंगातून सुटका  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • अनेक वर्षांपासून दक्षिण कोरियातल्या बांधवांना तुरुंगात का टाकण्यात येत होतं?

  • न्यायालयाच्या कोणत्या निर्णयांमुळे काही बांधवांची तुरुंगातून लवकर सुटका झाली?

  • जगभरात जे बांधव विश्‍वासामुळे तुरुंगात आहेत त्यांना आपण कशी मदत करू शकतो?

  • सध्या अनुभवत असलेल्या स्वातंत्र्याचा आपण कसा वापर केला पाहिजे?

  • न्यायालयीन खटल्यांमध्ये मिळालेल्या विजयाचं श्रेय आपण कोणाला दिलं पाहिजे?

मी माझ्या स्वातंत्र्याचा कसा वापर करत आहे?