व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

नियतकालिकं देत राहा

नियतकालिकं देत राहा

२०१८ पासून प्रचारात दिल्या जाणाऱ्‍या नियतकालिकांमध्ये एका अंकात एकाच विषयाबद्दल सांगितलं जातं. ही सर्व नियतकालिकं शिकवण्याच्या साधनांचा एक भाग आहेत. त्यामुळे आपण ती प्रचारकार्यात देऊ शकतो. बाजारात जाताना किंवा प्रवास करताना आपण आपल्याजवळ काही नियतकालिकं ठेवू शकतो. ही नियतकालिकं बायबल अभ्यास करण्यासाठी बनवण्यात आलेली नाहीत. पण यांमुळे एखाद्या व्यक्‍तीला देवाबद्दल जाणून घेण्याची आवड निर्माण होऊ शकते.

एखाद्या व्यक्‍तीशी बोलणं सुरू केल्यानंतर तिला एक वचन दाखवा. त्यानंतर, तिला आवडेल असा एखादा विषय असलेल्या नियतकालिकाबद्‌ल तिला सांगा. समजा, त्या व्यक्‍तीवर कुटुंबाची जबाबदारी असेल किंवा ती दुःखात किंवा तणावात असेल. तर अशा वेळी तुम्ही तिला म्हणू शकता: “अलिकडेच मी या विषयावर एक चांगला लेख वाचलाय. तो तुम्हाला दाखवला तर चालेल का?” त्या व्यक्‍तीने आवड दाखवली तर तुम्ही तिला पहिल्या भेटीतच नियतकालिकाची छापील प्रत देऊ शकता किंवा इलेक्ट्रॉनिक प्रत पाठवू शकता. आपला उद्देश फक्‍त नियतकालिकं देणं नाही तर अशा लोकांना शोधणं आहे, ज्यांना शिकायची आणि शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू करायची इच्छा आहे.—प्रेका १३:४८.

२०१८

२०१९

२०२०

 

तुमच्या क्षेत्रातल्या लोकांना कोणत्या विषयांवर बोलायला आवडतं?