७-१३ डिसेंबर
लेवीय १०-११
गीत २७ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“कुटुंबापेक्षा आपलं यहोवावर जास्त प्रेम असलं पाहिजे”: (१० मि.)
लेवी १०:१, २—नादाब आणि अबीहू यांनी नियमाविरूद्ध जाऊन यहोवासमोर अग्नी नेल्यामुळे त्याने त्यांचा नाश केला (इन्साइट-१ पृ. ११७४)
लेवी १०:४, ५—त्यांच्या प्रेतांना छावणीबाहेर नेण्यात आलं
लेवी १०:६, ७—यहोवाने अहरोन आणि त्याच्या इतर मुलांना सांगितलं की त्यांनी शोक करू नये (टेहळणी बुरूज११ ७/१५ पृ. ३१-३२ परि. १६)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
लेवी १०:८-११—आपण या वचनांतून काय शिकू शकतो? (टेहळणी बुरूज१४ ११/१५ पृ. १७ परि. १८)
लेवी ११:८—ख्रिश्चनांनी मोशेच्या नियमशास्त्रात मनाई केलेल्या प्राण्यांचं मांस खाणं टाळलं पाहिजे का? (इन्साइट-१ पृ. १११ परि. ५)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) लेवी १०:१-१५ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. मग पुढे दिलेले प्रश्न श्रोत्यांना विचारा. सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला प्रचारकाने कशा प्रकारे हाताळलं? स्तोत्र १:१, २ या वचनावर तुम्ही एखाद्याशी कसा तर्क कराल?
पहिली भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालकाला सभेची आमंत्रणपत्रिका द्या आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्यसभागृहात कोणत्या सभा भरतात? या व्हिडिओबद्दल सांगा. (व्हिडिओ दाखवू नका) (शिकवणे अभ्यास २०)
भाषण: (५ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज११ २/१५ पृ. १२—विषय: एलाजार आणि इथामार यांच्यावर असलेला मोशेचा राग कसा शांत झाला? (शिकवणे अभ्यास १२)
ख्रिस्ती जीवन
“यहोवाच्या शिस्त लावण्याच्या व्यवस्थेला साथ देऊन आपण प्रेम दाखवतो”: (१५ मि.) चर्चा. पूर्ण मनाने यहोवाला एकनिष्ठ राहा हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि. किंवा कमी) आनंदी कुटुंब भाग ४
समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)
गीत ४२ आणि प्रार्थना