ख्रिस्ती जीवन
यहोवाच्या शिस्त लावण्याच्या व्यवस्थेला साथ देऊन आपण प्रेम दाखवतो
पश्चात्ताप न दाखवणाऱ्या व्यक्तीला बहिष्कृत केल्यामुळे मंडळीचं संरक्षण होतं आणि त्या व्यक्तीला शिस्त लावली जाते. (१कर ५:६, ११) एखाद्या व्यक्तीला बहिष्कृत केलं जातं तेव्हा तिच्या नातेवाइकांना आणि न्यायिक समितीला खूप दुःख होतं. पण आपल्याला दुःख होत असतानाही आपण यहोवावर प्रेम असल्याचं कसं दाखवू शकतो? आपण यहोवाच्या शिस्त लावण्याच्या व्यवस्थेला पाठिंबा देतो तेव्हा आपण त्याच्यावर प्रेम असल्याचं दाखवतो.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपण यहोवाचं नाव आणि पवित्रतेबद्दल असलेल्या त्याच्या स्तरांवर प्रेम असल्याचं दाखवतो. (१पेत्र १:१४-१६) तसंच बहिष्कृत झालेल्या व्यक्तीवरही आपलं प्रेम असल्याचं आपण दाखवतो. कडक शिक्षेमुळे सुरुवातीला दुःख होतं, पण तिच्यामुळे आपल्यात “नीतिमत्त्वाचं शांतिदायक फळ उत्पन्न” होतं. (इब्री १२:५, ६, ११) आपण जर बहिष्कृत झालेल्या किंवा मंडळीला सोडून गेलेल्या व्यक्तीच्या संर्पकात राहिलो, तर आपण यहोवाच्या व्यवस्थेच्या आड येतोय असा याचा अर्थ होईल. यहोवा नेहमी त्याच्या सेवकांना “योग्य प्रमाणात” शिस्त लावतो हे विसरू नका. (यिर्म ३०:११) आपण यहोवाच्या शिस्त लावण्याच्या व्यवस्थेला पाठिंबा देत राहिलो आणि आध्यत्मिक कार्यात व्यस्त राहिलो, तर बहिष्कृत झालेली व्यक्ती एक ना एक दिवस आपल्या दयाळू पित्याकडे नक्की परत येईल, अशी आशा आपण बाळगू शकतो.—यश १:१६-१८; ५५:७.
पूर्ण मनाने यहोवाला एकनिष्ठ राहा हा व्हिडिओ पाहा आणि पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
-
आपलं मूल यहोवाला सोडून जातं तेव्हा ख्रिस्ती आईवडिलांना कसं वाटतं?
-
कुटुंबातल्या विश्वासू सदस्यांना मंडळीतले भाऊबहीण कशी मदत करू शकतात?
-
कुटुबांपेक्षा यहोवाला एकनिष्ठ राहणं जास्त महत्त्वाचं आहे, हे बायबलमधल्या कोणत्या अहवालातून कळतं?
-
आपण कुटुंबापेक्षा यहोवाला एकनिष्ठ आहोत हे कसं दाखवू शकतो?