ख्रिस्ती जीवन
तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आम्ही यहोवाचे आभार मानतो
छळ आणि संकटं सोसत असतानाही थेस्सलनीकामधल्या ख्रिश्चनांनी आपल्या भाऊ-बहिणींना मदत करून प्रेम दाखवलं. (२थेस १:३, ४) यहोवाचे लोक आजही जगभरातल्या आपल्या भाऊ-बहिणींना अशाच प्रकारचं प्रेम दाखवतात. भाऊ-बहिणींनी दिलेल्या दानामुळेच, आज या कठीण काळात वेगवेगळ्या क्षेत्रात मदत करणं शक्य झालं आहे. याबद्दल jw.org या वेबसाईटवर असलेल्या “दान किए गए पैसों का इस्तेमाल कैसे किया जाता है?” या लेखमालिकेत सांगण्यात आलं आहे. तुम्ही दाखवलेल्या या उदारतेबद्दल आम्ही मनापासून तुमची प्रशंसा करतो!
तुमच्या या मदतीसाठी ‘आम्ही नेहमी देवाचे आभार मानतो’ हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
• आपल्या दानाचा वापर करून कोणकोणती कामं केली जातात?
• आर्थिक मदतीची गरज असलेल्या भाऊबहिणींना मदत करण्याचा सगळ्यात चांगला मार्ग कोणता आहे?—jw.org या वेबसाईटवर असलेला “बहुतायत से पूरी की गयी घटी” हा लेखसुद्धा पाहा