व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सेवाकार्यासाठी तयार व्हा | सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा

विद्यार्थ्याला वैयक्‍तिक अभ्यास आणि मनन करायला शिकवा

विद्यार्थ्याला वैयक्‍तिक अभ्यास आणि मनन करायला शिकवा

आपला विद्यार्थी बायबल अभ्यास करताना बरंच काही शिकतो, पण तेवढंच पुरेसं नाही. यहोवासोबत मैत्री करण्यासाठी आणि प्रगती करत राहण्यासाठी त्याने वैयक्‍तिक अभ्यास करणं गरजेचं आहे.—मत्त ५:३; इब्री ५:१२–६:२.

सुरुवातीपासूनच अभ्यासाची तयारी कशी करायची ते विद्यार्थ्याला शिकवा आणि अभ्यासाआधी प्रत्येक वेळी तयारी करण्याचं प्रोत्साहन द्या. (सभेसाठी कार्यपुस्तिका  १८.०३ ) वैयक्‍तिक अभ्यास करण्याआधी प्रार्थना करणं त्याला शिकवा. तसंच त्याला आपल्या वेबसाईट आणि ॲपमध्ये असलेल्या प्रकाशनांचा वापर करायला शिकवा. jw.org वर ‘नवीन काय आहे ते पाहा’ हा टॅब वेळोवेळी पाहात राहण्याचं प्रोत्साहन त्याला द्या. मग रोज बायबल वाचन करणं, सभांची तयारी करणं आणि संशोधन करून आपल्या प्रश्‍नांची उत्तरं शोधणं त्याला शिकवा. शिकलेल्या गोष्टींवर मनन करणं गरजेचं आहे हे त्याला सांगा.

तुमच्या बायबल विद्यार्थ्याला मदत करात्याची आध्यात्मिक भूक तृप्त करायला  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • सभेची तयारी करणं म्हणजे फक्‍त उत्तरं शोधणं नसतं हे निताने कसं समजावलं?

  • अनैतिकतेबद्दल यहोवाने दिलेली आज्ञा योग्य आहे, हे जेडला कसं पटलं?

  • विद्यार्थ्याला अभ्यास करायला आणि शिकलेल्या गोष्टींवर मनन करायला शिकवा

    मनन करण्याबद्दल जेड काय शिकली?